भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रशैक्षणिक

अरे सगळेच पास होणार ! दहावीचा निकाल जुलै, तर बारावीचा निकाल ऑगस्टमध्ये; असा लावणार रिझल्ट

Monday To Monday NewsNetwork।

मुंबई (वृत्तसंस्था)। दहावीची परीक्षा रद्द झाल्याने सरसकट विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले जाणार आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करताना नववीच्या गुणांवरून 50 टक्‍के तर तोंडी परीक्षेतून 20 टक्‍के आणि पूर्व परीक्षा, लेखी परीक्षेतील गुणांवरून 30 टक्‍के गुण देण्याचे धोरण ठरले आहे.

आता बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार करताना त्यांच्यासाठी दहावी की अकरावीच्या गुणांचा आधार घ्यावा, या पेचात शालेय शिक्षण विभाग सापडले असतानाच दहावीचा निकाल जुलैपर्यंत जाहीर होईल, असे पुणे बोर्डचे अध्यक्ष दिनकर पाटील म्हणाले.दरम्यान, बारावाची निकालही ऑगस्टमध्ये जाहीर केला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांचे मूल्यमापन शासनाने दिलेल्या आदेशानुसार व्हावे. शाळांनी त्यात काही फेरफार केल्यास निश्‍चितपणे कारवाई होईल असेही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!