भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यमहाराष्ट्र

महाराष्ट्रात ओमायक्रॉनने चिंता वाढवली ,रुग्ण संख्येत वाढच,आता पर्यंत “एव्हडे” रुग्ण

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुंबई, वृत्तसेवा। महाराष्ट्रात ओमायक्रॉनने चिंता वाढवली
असून राज्यात ओमायक्रॉनच्या आणखी 8 रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 6 रुग्ण पुणे तर मुंबई आणि कल्याण डोंबिवलीमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे राज्यात आतापर्यंत ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या 40 वर गेली आहे.

राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या ओमायक्रॉन सर्वेक्षणविषयक माहितीनंतर राज्यातील ओमायक्रॉन बाधितांची संख्या ४० झाली आहे. यात, सर्वाधिक १४ मुंबईत, पिंपरी चिंचवडमध्ये १०, पुणे ग्रामीणमध्ये ६, तर पुणे मनपा, कल्याण-डोंबिवली, उस्मानाबादमध्ये प्रत्येकी २ आणि बुलडाणा, नागपूर, लातूर आणि वसई-विरार या ठिकाणी प्रत्येकी एक एक रुग्ण आढळला आहे.

तसेच शुक्रवारी ओमायक्रॉनबाधित आढळलेले सर्व आठ रुग्ण वय वर्षे २९ ते ४५ या वयोगटातील आहेत. त्यातील ७ रुग्ण लक्षणेविरहित, १ रुग्ण सौम्य स्वरूपाचा आहे. हे सर्व प्रयोगशाळा नमुने डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात आले होते. प्राथमिक माहितीनुसार यापैकी पुणे येथील ४ रुग्णांचा दुबई प्रवास आणि २ रुग्ण निकट सहवासित आहेत. मुंबई येथील एका रुग्णाचा अमेरिका प्रवास आणि कल्याण-डोंबिवली येथील एका रुग्णाचा नाजेरिया प्रवास झाला आहे. या ८ रुग्णांपैकी २ जण रुग्णालयात तर ६ जण घरीच विलगीकरणात आहेत. या रुग्णांच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात येत आहे.

दरम्यान राज्यात शुक्रवारी ९०२ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाल्याने आतापर्यंतच्या बाधितांची संख्या ६६ लाख ४७ हजार ८४० झाली आहे. सध्या राज्यात ६,९०३ ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर काल दिवसभरात ६८० जणांची रुग्णालयातून सुटका झाल्याने आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ६४ लाख ९५ हजार ९२९ झाली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!