भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यमहाराष्ट्र

Omicron Variant: राज्यात २० नव्या ओमिक्रॉन बाधितांची भर,रुग्णांची संख्या १०८

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुंबई,वृत्तसंस्था। राज्यात आज ओमिक्रॉन बाधितांची संख्या ३ ने कमी झाली आहे. मात्र आज राज्यात २० नव्या ओमिक्रॉन बाधितांची नोंद करण्यात आली आहे. नोंद करण्यात आलेल्या १४ रुग्णांची नोंद राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने तर ६ रुग्ण भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थाकडून करण्यात आली आहे. राज्यात आज नोंद करण्यात आलेल्या २० रुग्णांपैकी ६ रुग्ण पुण्यातील आहेत. पुणे मनपा येथील १ रुग्ण तर पुणे छावणी बोर्ड येथील ५ रुग्ण आहेत. तर मुंबईत ११ नव्या ओमिक्रॉन बाधितांची नोंद करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात २ आणि अहमदनगर जिल्ह्यात आज १ ओमिक्रॉन बाधित रुग्ण आढळला आहे. त्यामुळे राज्यात आतापर्यंत नोंद करण्यात आलेल्या ओमिक्राँन रुग्णांची संख्या १०८ इतकी झाली आहे.

आज आढळलेल्या २० ओमिक्रॉन रुग्णांपैकी १५ रुग्ण हे आंतररष्ट्रीय प्रवासी आहेत. तर १ आंतरदेशीय प्रवासी तर ४ जण त्यांच्या संपर्कात आलेले आहेत. यातील १ रुग्ण हा १८ वर्षाखालील असून ६ जण ६० वर्षांवरील आहेत. हे सर्व सर्व रुग्ण लक्षणेविरहित आहेत. तसेच १२ रुग्णांचे पूर्ण लसीकरण झाले आहे, ७ रुग्णांचे लसीकरण झालेसे नाही. त्याचप्रमाणे १ रुग्ण लसीकरणासाठी पात्र नाहीत.

राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रात्री ९ ते सकाळी ६ पर्यंत संचार बंदी लागू करण्यात आली आहे. या वेळेत ५ पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊ शकत नाही. परिवहन मंत्री अनिल परब यांनी विधानसभेत ही माहिती दिली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!