पाच राज्याच्या निवडणुका संपताच पेट्रोल डीझल च्या किमतीत वाढ
Monday To Monday NewsNetwork।
मुंबई (वृत्तसंस्था)।गेल्या काही दिवसांपासून पाच राज्यांच्या विधानसभेच्या सुरू होत्या ,निवडणुका संपल्यानंतर लगेचच पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ झाल्याचं दिसून आलं. तेल कंपन्यांनी पेट्रोलचे दर १२ पैशांवरून १५ पैसे केले आहेत. तर डिझेल १८ पैशांनी महागले आहे. यापूर्वी १५ एप्रिल रोजी महागड्या पेट्रोल आणि डिझेलमधून सर्वसामान्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. एप्रिलमध्ये आणि मार्च महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती तीन वेळा कमी करण्यात आल्या.या दोन महिन्याच्या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या असूनही देशातल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ करण्यात आली नव्हती. यामागे सहाजिकच पाच राज्यातील निवडणुका हे कारण होतं. मात्र जशा या निवडणुका संपल्या तसं लगेचच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्याच दिसून आलं,
निवडणुका झाल्यानंतर आता होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे आता सामान्यांच्या खिशाला कात्री लागणार हे नक्की. काही विश्लेषकांकडून अस सांगण्यात आलं की या पुढे आता रोज पेट्रोलच्या आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे,पेट्रोलच्या दरात मुंबई मध्ये वाढ होऊन ती ९६.९५ रुपये तर डिझेलची आजची किंमत ही ८७.९८ रुपये इतकी झाली आहे. देशाची राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल आता ९०.५५ रुपये , तर डिझेल ८०.९१ रुपये भाव आहेत.