भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

पवार-ठाकरे याच्या भेटीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष, ” या ” मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित!

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुंबई(वृत्तसंस्था)। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत आहेत. मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान वर्षा या ठिकाणी ही भेट होणार आहे. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. अजूनही राज्यपाल नियुक्त 12 विधानपरिषद सदस्यांचा प्रश्न मिटलेला नाही. त्यामुळे या भेटीत या मुद्द्यासह विविध मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित आहे. यामध्ये  राज्यातील पूर परिस्थिती, कोरोना आढावा, ओबीसी राजकीय आरक्षण, राज्यात महाविकास आघाडीतील नेत्यांवर ईडीचे धाडसत्र आणि  महाविकास आघाडीतले समन्वयाचे मुद्दे अशा विषयांवर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा होऊ शकते.

 कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित? 
राज्यातील पूर परिस्थिती,कोरोना परिस्थिती
12 आमदारांचा मुद्दा
ओबीसी राजकीय आरक्षण
राज्यात महाविकास आघाडीतील नेत्यांवर ईडीचे धाडसत्र
महाविकास आघाडीतले समन्वयाचे मुद्दे

12 आमदारांचा मुद्दा
राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या निवडीचा वाद अजूनही कायम आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी बुधवारी 1 सप्टेंबरला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर जाऊन भेट घेतली. विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या निवडीची कोंडी फोडण्यासाठी ही भेट घेण्यात आली.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीपूर्वी राष्ट्रवादीची बैठक
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्व मंत्री, खासदार, आजी-माजी आमदार आणि विधानसभा निवडणुकीत तिकिट दिलेले 114 उमेदवार उपस्थित होते. यावेळी पवारांनी सर्वांकडून मतदारसंघाचा आढावा घेतला. तसेच त्यांच्या तक्रारी आणि सूचनाही जाणून घेतल्या.
सरसकट आघाडी नाही
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ज्या ठिकाणी ओबीसींसाठी जागा आरक्षित होत्या त्या ठिकाणी ओबीसीच उमेदवार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कुणाशाही सरसकट आघाडी किंवा युती केली जाणार नाही. स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घेऊ, असं मलिक यांनी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!