भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीयआरोग्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्या “या” तीन मोठ्या घोषणा

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

नवी दिल्ली, वृत्तसंस्था। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधत आज ३ मोठ्या घोषणा केल्या आहेत. ते म्हणाले, “१५ ते १८ वयातील मुलांसाठी देशात ३ जानेवारी २०२२ पासून लसीकरण सुरू होईल. हा निर्णय करोना विरोधातील देशाच्या लढाईला ताकद देईल. तसेच शाळा महाविद्यालयात जाणाऱ्या मुलांच्या आई-वडिलांची काळजीही कमी करेल.”

त्याचबरोबर वयोवृद्ध आणि आधीपासूनच इतर आजारांनी ग्रासलेल्या ६० वर्षांवरील नागरिकांना देखील त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बुस्टर डोसचा पर्याय उपलब्ध असेल. याची सुरुवात देखील १० जानेवारीपासून होणार असल्याचे मोदींनी सांगितले.

आरोग्य कर्मचाऱ्यांचं देशाला सुरक्षित ठेवण्यात मोठं योगदान आहे. ते आजही करोना रूग्णांच्या सेवेत बराच वेळ घालवतात. त्यामुळे सुरक्षेचा भाग म्हणून सरकारने फ्रंट लाईन वर्कर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना बुस्टर डोस देण्याचा निर्णय घेतलाय. याची सुरुवात १० जानेवारी २०२२ पासून होईल,” अशी घोषणा मोदींनी केली.

मोदींनी केलेल्या ” या ” तीन मोठ्या घोषणा : . १५-१८ वयोगटातील मुलांसाठी ३ जानेवारी २०२२ पासून लसीकरण सुरू करणार.
. आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी १० जानेवारी २०२२ पासून बुस्टर डोसची सुरुवात होणार.
. वयोवृद्धांसाठी देखील खबरदारी म्हणून १० जानेवारी २०२२ पासून बुस्टर डोस दिला जाणार.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!