भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

…तर ते लगेच सरकार स्थापन करायला तयार होतील – खडसेंचा फडणवीसाना टोला

Monday To Monday NewsNetwork।

मुंबई(वृत्तसंस्था)।  ‘भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सत्ता गेल्यापासून ते अस्वस्थ आहेत.  त्यांची तळमळ दिसून येत आहे, त्यामुळे जर त्यांना कोणताही पक्षाने साथ दिली ते सरकार स्थापन करायला तयार होतील’, असा सणसणीत टोला राष्ट्रवादीचे नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी लगावला.

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी आज सकाळी महसूल मंत्री बाळसाहेब थोरात यांची शासकीय निवास्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना खडसे यांनी महाविकास आघाडी सरकार पडणार का यासह इतर विषयावर भाष्य केले.

‘देवेंद्र फडणवीस सत्ता गेल्यापासून ते अस्वस्थ आहेत. त्या कारणामुळे मी सत्तेत आलं पाहिजे, यासाठी त्यांनी अजित पवारांसोबत घेऊन सत्ता स्थापन केली होती. पण, दुर्दैवाने सत्ता काही टिकली नाही. पण आजही त्यांची तळमळ दिसतेय. त्यामुळे सरकार स्थापन करायला तायार होतील.असा  प्रसंग आला तर कोणताही पक्षाला सोबत घेऊन ते तयार होतील’ असा टोला खडसेंनी फडणवीसांना लगावला.

तसंच, ‘महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले आहे. सरकार भक्कम आहे, त्यामुळे सत्ता न आल्यामुळे भाजप आमदारांमध्ये अस्वस्थता आहे, आपलं सरकार येणार असं आमदारांना सांगून वेळ काढला जात आहे, भाजपमध्ये अनेक नाराजांची संख्या वाढू नये म्हणून भाजप नेत्यांचे प्रयत्न सुरू आहे, असंही खडसे म्हणाले.तसेच, ‘महाविकास आघाडी सरकार आल्यापासून चंद्रकांत पाटील सांगतात सरकार पडणार,  फडणवीस म्हणाले सरकार पडणार, भाजपचे उरलेले अनेक नेते वेगवेगळा मुहूर्त सांगत आहे, पण सरकार पडत नाही. दिवसेंदिवस सरकार आणखी मजबूत होत आहे’, असा टोलाही खडसेंनी चंद्रकांत पाटलांना लगावला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!