धनंजय मुंडेंच्या विरोधातील बलात्काराची तक्रार मागे !
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई (प्रतिनिधी): राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ज्या गायक महिलेने धनंजय मुंडेंवर बलात्काराची तक्रारार केली होती. ज्यामुळे धनंजय मुंडे अडचणीत आले होते. त्याच तक्रारारदार महिलेने आता आपली तक्रार मागे घेतली आहे. रेणू शर्माने लेखी अर्ज देवून आपली तक्रार मागे घेतली आहे.
राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या रेणू शर्मा हिने आपली तक्रार मागे घेतली आहे.याच बलात्काराची तक्रारारीमुळे धनंजय मुंडे मोठे अडचणीत आले होते. तर विरोधकांनीही त्यांच्या राजेंनाम्याची मागणी केली होती आता तक्रार मागे घेण्यात आल्याने मुंडेंना मोठा दिलासा मिळाला आहे.
“मी केलेली तक्रार काही कारणास्तव मी मागे घेत आहे” असं प्रतिज्ञपत्र रेणू शर्मा हिने पोलिसांना दिले आहे. तर या प्रकरणातील रेणू शर्माचे वकील यांनी 3 दिवसांपूर्वीच काही खाजगी कारण सांगत रेणू शर्माची केस त्यांनी सोडली होती. त्यानंतर आता रेणू शर्मानेच तक्रार मागे घेतली त्यामुळे धनंजय मुंडेंना मोठा दिलासा मिळाला आहे. 15 जानेवारीला रेणू शर्माने ट्विट करुन आपण तक्रारार मागे घेत असल्याचे सागंतिले होते. आता संबंधित महिलेने धनंजय मुंडे यांच्याविरोधातील तक्रार मागे घेतली आहे. कौटुंबिक कारणं आणि या प्रकरणाचं राजकारण होत असल्याने गुन्हा दाखल करु नये अशी विनंती तिने पोलिसांकडे केली आहे. दरम्यान बलात्काराची तक्रार मागे घेतल्याने धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.