भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

बलात्कार पीडितेची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी : उपचारा दरम्यान मृत्यू

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुंबई, मंडे टू मंडे वृत्तसेवा : मुंबईतील अंधेरी परिसरातील साकीनाका येथे बलात्कार झालेल्या त्या पीडित महिलेची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली आहे. पीडित महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. मुंबईतील राजावाडी रुग्णालयात पीडित महिलेवर उपचार सुरू होते. या प्रकाराने मुंबई पुन्हा एकदा हादरुन गेली. या महिलेची प्रकृती गंभीर होती. तिच्यावर मुंबईतील राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथेच तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

पीडित महिला अद्यापही बेशुद्धावस्थेत होती. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने पीडित महिलेची प्रकृती खूपच चिंताजनक होती. पीडितेवर डॉक्टरांकडून उपचार सुरू होते मात्र, दुर्देवाने तिचा मृत्यू झाला. या घटनेवरुन संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त होत असून पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी ४५ वर्षीय आरोपी मोहन चौहानला अटक केली आहे.

शुक्रवारी मुंबईतील एक धक्कादायक घटना समोर आली होती. महिलेवर बलात्कार करण्यात आल्यानंतर आरोपीने गुप्तांगात रॉड घुसवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. साकीनाका येथील खैरानी रोड परिसरात ही घटना घडली होती. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी मोहन चौहानला अटक केली आहे. मात्र यामध्ये अजून काही जण सहभागी असल्याचा संशय आहे.

पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारास कंट्रोल रुमला साकीनाका येथे खैराना रोडवर एक महिला रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडली असल्याचा फोन आला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त आणि अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी घटनास्थळी धाव घेतली होती. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी महिलेला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केलं होतं. महिलेवर उपचार सुरु होते, मात्र तिची स्थिती खूप गंभीर होती. उपचार सुरु असतानाच शनिवारी पीडितेचा मृत्यू झाला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!