भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यमहाराष्ट्रशैक्षणिक

राज्यभरात उद्यापासून शाळा सुरु होणार,परन्तु एकाही मुलाला कोरोना संसर्ग झाल्यास त्या…..

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुंबई,वृत्तसंस्था। राज्यभरात उद्यापासून बालवाडी ते इयत्ता बारावी पर्यंतच्या शाळा सुरु होत आहेत. राज्यातील शाळा सुरू करण्या संदर्भात शिक्षण विभागाला आरोग्य विभागाकडून सूचना करण्यात आल्या आहेत. शाळा सुरू करा मात्र संसर्ग वाढायला नको, यासाठी अधिकाऱ्यांनी काळजी घेऊन दक्ष राहिले पाहिजे, अशा सूचना देखील दिल्या आहेत. शाळा सुरू करण्यासंदर्भात स्थानिक प्रशासन निर्णय घेणार असले तरी शाळा सुरू झाल्यानंतर मुलांकडे बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे. एकाही मुलाला कोरोना संसर्ग झाल्यास त्या वर्गाला तत्काळ सुट्टी दिली पाहिजे, असे राज्‍याचे आराेग्‍यमंत्री राजेश टाेपे यांनी सांगितले.

राज्यात कुठेही रुग्णाची संख्या कमी झाल्यास तेथील निर्बंध कमी करण्यात येणार आहेत. मुलांना शाळेत पाठवण्यासंदर्भात पालकांचा विरोध होत असला तरी शाळेमध्ये मुलांना पाठवले पाहिजे अशी पालकांना विनंती केली आहे. शासनाने सर्व बाजूने काळजी घेतली असून शिक्षण संस्थांनी पण कोरोना नियमांचे नियम पाळण्याचे मान्य करून त्यापद्धतीने सूचना केल्या आहेत, असेही त्‍यांनी नमूद केले.

“सर्वच शाळा सुरु कराव्यात अशाच सुचना आहेत. पण ज्या जिल्ह्यांमध्ये अतिशय जास्त पॉझिटिव्ही रेट असेल त्या ठिकाणी स्थानिक प्रशासन आणि पालकमंत्र्यांनी निर्णय घ्यावा, असे ठरविण्यात आले आहे. प्रशासनाने ठरवणे योग्य राहील. शाळा सुरु झाल्यानंतर मुलांकडे अधिक बारकाईने लक्ष दिले पाहिजे. कुणी विद्यार्थी थोडा जरी लक्षणे असलेला आढळला तर त्याच्याकडे लक्ष ठेवून त्याची लगेच तपासणी झाली पाहिजे. एखाद्या शाळेतला मुलगा पॉझिटिव्ह आढळला तर त्या लगेचच त्या वर्गाला सुद्धा ताबोडतोब सुट्टी दिली पाहिजे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!