विधानसभा अध्यक्ष साठी पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला सेनेची पसंती? निवडीचा तिढा कायम
Monday To Monday NewsNetwork।
मुंबई(वृत्तसंस्था)। महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षपदाची निवड येत्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात होण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देत काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद स्वीकारलं होतं. काँग्रेसमध्ये पुण्यातील आमदार संग्राम थोपटे यांचं नाव आघाडीवर असल्याची माहिती आहे. तर, दुसरीकडे शिवेसना संग्राम थोपटे यांच्या नावाबद्दल साशंक असल्याची माहिती आहे. शिवसेनेनं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला पसंती दर्शवल्याची सूत्रांची माहिती आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेस पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब अशी परिस्थिती नाही. संग्राम थोपटे यांच्या नावावर राष्ट्रवादी काँग्रेस तयार होणार का हे पाहावं लागणार आहे. एकूणचं महाराष्ट्रातील राजकारण विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीमुळे ढवळून निघालं आहे. 5 आणि 6 जुलैला होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष निवडला जाणार का हे पाहावं लागणार आहे.