तर त्या दिवशी पूर्ण महाराष्ट्र लॉकडाऊन करावा लागेल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा इशारा
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई(वृत्तसंस्था)। नागरिकांनी कोरोना नियमांचं पालन केलं नाही. सतत कोरोना नियमांचं उल्लंघन केल्यास अपेक्षेपेक्षा तिसरी लाट येऊ शकते त्यामुळे नागरिकांनी कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी नियमांचं पालन करावं, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कोरोनाची तिसरी लाट आली तर लॉकडाऊन लावावा लागेल,असं म्हटलंय. मुंबई विद्यापीठ आणि महापालिकेच्यावतीनं कोरोना सेंटरचं उद्घाटन करण्यात आलंय. आपण गंभीर राहिलो नाही, कोरोना नियमांचं उल्लंघन केलं तर कोरोनाची तिसरी लाट अपेक्षेपेक्षा लवकर येऊ शकते. दुसऱ्या लाटेवेळी राज्याकडे असलेल्या ऑक्सिजन साठ्यामध्ये फारशी वाढ झालेली नाही. ज्यावेळी राज्यात 700 मेट्रिक टन ऑक्सिजन लागेल त्या दिवशी पूर्ण महाराष्ट्र लॉकडाऊन करावा लागेल, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना कोरोना नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.