भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रशैक्षणिक

SSC परीक्षा:शालेय विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत राज्य सरकार गंभीर नाही,हायकोर्टाने राज्यसरकार ला फटकारले

Monday To Monday NewsNetwork।

मुंबई(वृत्तसंस्था)। राज्यात कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दहावीच्या बोर्ड परिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. परंतु या निर्णयाला आव्हान देत निवृत्त प्राध्यापक आणि पुणे विद्यापीठाचे माजी सदस्य धनंजय कुलकर्णी यांनी मुंबई उच्च न्यायालयात ही जनहित याचिका दाखल केली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारावा आणि अकरावी प्रवेश प्रक्रियेतील गोंधळ कमी करण्यासाठी दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला तात्काळ स्थगिती देत दहावीच्या परिक्षा तात्काळ घेण्यात याव्यात अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे.या याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी सुरु आहे.

राज्य सरकार शालेय विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत गंभीर का नाही? असा सवाल उपस्थित करत मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारले आहे. इतर प्रकरणात वकीलांची फौज उभी करणारे सरकार विद्यार्थ्यांसाठी कुणी ज्येष्ठ वकील का नाही येत? या प्रकरणाची गांभीर्यता ओळखा अशा कडक शब्दांत हायकोर्टाने राज्य सरकारला इशारा दिला आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती शाहरुख काथावाला आणि न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांच्या सुट्टीकालीन खंडपीठासमोर बुधवारी रात्री सुनावणी झाली. शालेय विद्यार्थ्यांच्या दहावीच्या परीक्षा रद्द करणे हा विद्यार्थ्यांच्या भवितव्यासंदर्भातील इतका महत्त्वपूर्ण विषय असताना महाधिवक्ता हजर का झाले नाही? असा गंभीर सवाल हायकोर्टाने उपस्थित केला. दहावीच्या परिक्षांबाबत राज्य सरकार विचार करणार आहे की नाही? असा सवाल हायकोर्टाने उपस्थित करत राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.

राज्यातील कार्यरत असणाऱ्या एसएसी, सीबीएसई, आयसीएसई आणि इंटरनॅशनल बोर्डसह विविध बोर्ड परीक्षांमध्ये एकवाक्यता नाही. त्यामुळे परिक्षांबाबत केंद्र आणि राज्य सरकारमध्येही गोंधळाची परिस्थिती आहे. राज्य सरकार यापूर्वी परीक्षा घेण्यावर ठाम होते, मात्र ऐनवेळी परीक्षा रद्द करण्यात आल्या. त्यातही फक्त दहावी बोर्डच्या परीक्षा रद्द केल्या. मात्र बारावी बोर्डाच्या परीक्षा राज्य सरकार घेणार आहे. तर अकरावीच्या विद्यार्थ्यांचं भवितव्य अंतर्गत गुणांवर ठरवणार आहे, मग दहावीच्या परीक्षा रद्द करुन राज्य सरकाराने काय साध्य केले? असा थेट सवाल या याचिकेतून करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यावर याचा काय परिणाम होईल? याचा विचार या निर्णयात घेण्यात आलेलाच नाही, प्रवेश प्रक्रियेत भ्रष्टाचार करण्याला मार्ग मोकळा करून दिला आहे. असा आरोपही या याचिकेतून करण्यात आला आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दहावीच्या बोर्ड परिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. परंतु या निर्णयाला आव्हान देत निवृत्त प्राध्यापक आणि पुणे विद्यापीठाचे माजी सदस्य धनंजय कुलकर्णी यांनी मुंबई उच्च न्यायालयात ही जनहित याचिका दाखल केली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारावा आणि अकरावी प्रवेश प्रक्रियेतील गोंधळ कमी करण्यासाठी दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला तात्काळ स्थगिती देत दहावीच्या परिक्षा तात्काळ घेण्यात याव्यात अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!