भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

एसटी कर्मचाऱ्यांचा राज्य सरकारला इशारा;कर्मचारी आक्रमक

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुंबई,वृत्तसंस्था। ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचारी संपावर (ST employees strike) जाण्याची शक्यता आहे. तसा इशाराही राज्य सरकारला देण्यात आला आहे. प्रलंबित वेतनासाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. सरकारला इशारा देण्यासाठी 27 ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे. वेतन, रखडलेली देणी आणि एसटीचे विलिनीकरण या तीन मुद्यांवर महाराष्ट्र राज्य एसटी कर्मचारी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आपल्या मागण्या मान्य न झाल्यास हिवाळी अधिवशेनावेळी एसटी कर्मचाऱ्याचा मोर्चा काढण्याचा इशाराही एसटी कर्मचारी संघटनेने दिला आहे.

पगार वेळेत मिळावा, रखडलेली देणी लवकरात लवकर मिळावी तसेच एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या मागण्यांसाठी एटी कर्मचारी ठाम आहेत. या मागण्या पूर्ण कराव्या अन्यथा एसटी कर्मचारी संघटनांचा संपावर जातील, अशी माहिती महाराष्ट्र एसटी कामगार संघटना अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिली.

सध्या लालपरी महामंडळ दुर्देवाने लालपरी कर्मचा-यांच्या आत्महत्येच्या घटना सतत घडत आहेत. यामध्ये विशेषत: लालपरी महामंडळातील कमी पगार आणि त्यामधील अनियमितता यामुळे आत्महत्या केल्यामुळे मयत कर्मचा-यांनी चिठ्ठीत लिहून ठेवले आहे. ही बाब अत्यंत गंभीर असुन हृदयाला चटका लावणारी आहे. लालपरी कर्मचा-यांना अत्यंत कमी पगार असल्यामुळे त्यातच अनेक विभागात लॉकडाऊन हजेरी न दिल्याने रोख वेतन निव्वळ देय अत्यंत कमी होणार असल्याने दिपावली सारख्या मोठया सणामध्ये एवढया कमी पैशात सण साजरा करणे खूप जिकरीचे ठरणार आहे.

कारण अनेक कर्मचा-यांनी मुलभूत गरजा भागविण्याकरिता कर्ज काढले आहेत. तसेच घरभाडे, राशन, आई-वडीलांचे आजारपण, मुलांचे शिक्षण इतर कर्ज, उसणवारी या देणी असल्यामुळे दिवाळी सण साजरा करणे पगारात शक्य नाही. यामुळे लालपरी कर्मचा-यांचे वेतन आणि महागाई भत्ता थकबाकी, वार्षीक वेतन वाढीची थकबाकी, घरभाडे भत्त्याची थकबाकी देणे आवश्यक असल्याचे मुकेश तिगोटे यांनी यावेळी सांगितले आहे. रा. प. कर्मचा-यांना दिपावलीचा सण साजरा करण्यासाठी माहे ऑक्टोबर देय नोव्हेंबर महिन्याचे वेतन १ नोव्हेंबर दिवशी दिवाळी अगोदर अदा करण्यात यावे.

तसेच एकतर्फी वेतनवाढ लागू करताना १ एप्रिल, २०१६ पासून शासनप्रमाणे महागाई भत्ता, वार्षिक वेतन वाढीचा दर ३%, घरभाडे भत्ता ८, १६, २४% देण्याचे मान्य केले होते. परंतु, अद्यापपर्यंत अंमलबजावणी करण्यात आली नाही. यामुळे शासनाप्रमाणे भत्ते देऊन थकबाकीची रक्कम एक रकमी दिपावली अगोदर देण्यात या विविध मागण्या करीता महाराष्ट्र लालपरी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने २७ ऑक्टोबर दिवशी राज्यभर बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!