भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रशैक्षणिक

विद्यार्थ्यांना चित्रकलेचेही अतिरिक्त गुण मिळणार;दहावीच्या निकालात मोठा बदल,

Monday To Monday NewsNetwork।

मुंबई(वृत्तसंस्था)। कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता राज्य सरकारने इयत्ता १० वीच्या परीक्षा रद्द केल्या. यातच दहावीच्या निकालासंदर्भात आज राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मोठा बदल केला आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये आता चित्रकला परीक्षांचेही गुण समाविष्ट होणार आहेत. शैक्षणिक वर्षे २०२०-२१ या वर्षात जे दहावीचे विद्यार्थी यापूर्वी शासकीय रेखा कला परीक्षेत (एलिमेंटरी व इंटरमिजीएट ड्रॉईंग ग्रेड) उर्त्तीण झालेत. अशा विद्यार्थ्यांना शिक्षण मंडळाच्या प्रचलित धोरणांनुसार अतिरिक्त गुण मिळणार आहे. असे राज्य शासनाच्या शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आता दहावी इयत्तेत असणाऱ्या आणि एलिमेंटरी पास झालेल्या परंतु इंटरमिजीएट ड्रॉईंग ग्रेड चित्रकला परीक्षांमध्ये बसता न आलेल्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण मिळणार आहेत.

परंतु ही सवलत फक्त अशाच दहावीच्या विद्यार्थ्यांना लागू होणार आहे, जे एलिमेंटरी ड्रॉईंग ग्रेड परीक्षा उत्तीर्ण झालेत परंतु कोरोनामुळे इंटरमिजीएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षेस बसता आले नाही. या विद्यार्थ्यांना एलिमेंटरी ड्रॉईंग ग्रेड परीक्षेस मिळालेल्या श्रेणीच्या आधारे सन २०२०-२१ मध्ये इ. १० वी परीक्षेत अतिरिक्त गुणांची सवलत दिली जाणार आहे. यासंदर्भातील आदेश नुकताच शालेल शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आपल्या ट्वीटर अकाउंटवरुन शेअर केला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!