भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

TET Exam Scam : 240 कोटींचा शिक्षक परीक्षा घोटाळा, प्रत्येकी घेतले चार लाख रुपये

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुंबई,मंडे टू मंडे वृत्तसेवा। शिक्षक परीक्षा घोटाळ्यात (TET Exam Scam) आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. या घोटाळ्याची व्यप्ती तब्बल 240 कोटी रुपयांची असल्याचे पोलीस तपास उघड झाले आहे. प्रत्येक परीक्षार्थ्यांकडून तीन ते चार लाख रुपये घेतले असल्याचेही तपासात समोर आले आहे. परीक्षा परिषदेचे माजी अध्यक्ष तुकाराम सुपे आणि सुशील खोडवेकर यांच्यासह याप्रकरणी आतापर्यंत 14 जणांना अटक केली आहे. शिक्षक परीक्षा घोटाळ्या प्रकरणात आयएएस सुशील खोडवेकर याच्या अडचणीत वाढ झाली असून, त्याचा अर्ज पुणे सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.

टीईटी परीक्षेत आर्थिक गैरव्यवहार करताना प्रत्येक परीक्षार्थ्यांकडून तीन ते चार लाख रुपये घेतले. त्यातून तब्बल दोनशे चाळीस कोटी रुपयांच्या घोटाळ्याची व्याप्ती झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. सात हजार 580 अपात्र परीक्षार्थींना पात्र करण्यात आले. एकूण तीन लाख 43 हजार 284 जणांनी परीक्षा दिली होती. या परीक्षेच्या अंतिम निकाल यादीत एकूण 16 हजार 705 जण पात्र ठरले, त्यांना टीईटी प्रमाणपत्र देण्यात आली आहेत.

राज्यात घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी 2019 च्या परीक्षेतील पेपर फुटीत गैरव्यवहार केल्याचे प्रकरण उघडकीस आले. त्यानंतर या प्रकरणात परीक्षा घेणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांपासून राज्य परीक्षा परिषदेचे संचालकही सहभागी होते लक्षात आलं. परीक्षेच्या अंतिम यादीतील निम्म्या परीक्षार्थ्यांकडून पैसे स्वीकारून त्यांची नावे बनावट पद्धतीने टाकण्यात आल्याचा धक्कादायक समोर प्रकार समोर आला आहे. यासाठी परीक्षार्थ्यांकडून प्रत्येकी तीन ते चार लाख रुपये घेण्यात आल्याचे पोलीस तपास उघड झाले आहे.

पेपरफुटी प्रकरणात बीड कलेक्शन –
पेपरफुटी प्रकरणांमध्ये आतापर्यंत बीड जिल्ह्यातील अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यात उद्धव प्रल्हाद नागरगोजे हा शिरूर तालुक्यातील तिंतरवणी मध्ये शिक्षक आहेत. त्यानंतर मुख्य प्रशासकीय अधिकारी लातूरच्या आरोग्य विभागामध्ये काम करणारे प्रशांत बडगिरे. त्यानंतर मेंटल हॉस्पिटल अंबाजोगाईचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप जोगदंड, नेकनूर च्या स्त्री रुग्णालयात तील कर्मचारी श्याम मस्के, भूम येथील ग्रामीण रुग्णालयात सहाय्यक अधीक्षक राजेंद्र सानप, नामदेव करडे. त्यानंतर संजय सानप, विजय नागरगोजे यांना आतापर्यंत अटक झालेली आहे. आता या प्रकरणातील सर्वात मोठा अधिकारी असलेल्या सुशील खोडवेकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. सुशील खोडवेकर हे परळी तालुक्यातील खोडवा सावरगाव या गावातील रहिवाशी आहेत. कोण आहे सुशील खोडवेकर?
सुशील खोडवेकर हे मूळ परळी तालुक्यातील खोडवा सावरगाव येथील आहेत. यापूर्वी नांदेड परभणी आणि त्यानंतर आता मुंबईत वास्तव्यास आहेत. सुशिल खोडवेकर हे 2011 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत टीईटी परीक्षा गैरव्यवहार झाला, तेव्हा ते शालेय शिक्षण विभागामध्ये उपसचिव होते. यापूर्वी ठाणे पालघर येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प त्यांनी काम केले आहे. तसेच नांदेड वाघाळा महानगरपालिकेमध्ये आयुक्त आणि त्यानंतर परभणी जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सुद्धा सुशील खोडवेकर यांनी काम केले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!