भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यमहाराष्ट्र

पॉझिटीव्हीटी रेट कमी असलेल्या जिल्ह्यातील निर्बंध कमी करण्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेणार

Monday To Monday NewsNetwork।

मुंबई(वृत्तसंस्था)। राज्यातील ज्या जिल्ह्यामध्ये कोरोनाचा पॉझिटीव्हीटी रेट कमी आहे, त्या जिल्ह्यातील निर्बंध कमी करण्यासाठी टास्क फोर्स अभ्यास करीत आहे. हा अहवाल दोन दिवसांनी आल्यानंतर निर्बंध कमी करायचे की नाही याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. टोपे यांच्या हस्ते जालन्यात १०० खाटाच्या कोविड रुग्णालयाच उद्घाटन करण्यात आलं. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

सध्या राज्यात लसींचा तुटवडा मोठ्या प्रमाणात असून राज्यात पूर्ण क्षमेतेने लसीकरण करण्याची राज्याची क्षमता आहे, मात्र, केंद्राकडून लसीचा पुरवठा होत नसल्यानं लसीकरण करण्यात अडथळा येत आहे. लसींचा केंद्राकडून चांगल्या प्रमाणात पुरवठा झाल्यास राज्यात ७० ते ८० टक्के लसीकरण पूर्ण होऊन निर्बंध कमी करण्यास मदत होईल, असंही टोपे म्हणाले.

पूरग्रस्त जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या टीम पाठवण्यात आल्या आहेत. साथीचे आजार पसरवू नये, म्हणून प्रतिबंधक उपाय करण्याचे आदेश देण्यात आले असून खाजगी हॉस्पिटलमध्ये सीरियस रूग्णांसाठी 50 टक्के खाटा राखून ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती टोपे यांनी दिली. फ्रंट लाईन वर्करमध्ये 35 टक्के लसीकरण झालं असून फ्रंट लाईन वर्कर्सनी सर्वात अगोदर लसीकरण करून घ्यावं, जेणेकरून तिसऱ्या लाटेत या कर्मचाऱ्यांना आणखी काम करता येईल असं सांगून त्यांनी कर्मचाऱ्यांनी तातडीने लसीकरण करून घेण्याची सूचना टोपे यांनी केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!