विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर यश? वर्षा गायकवाड यांच स्पष्टीकरण
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई,वृत्तसंस्था। ऑफलाइन परीक्षा रद्द करून ऑनलाइन परीक्षा घ्यावी , या मागणीसाठी मुंबई, नागपूर, पुणे आणि बीडमध्ये विद्यार्थी ठिकठिकाणी आंदोलन करत आहेत.
यावर तज्ज्ञ व्यक्तींशी चर्चा करून या बाबतचा निर्णय घेऊ असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे. विद्यार्थ्यांमध्ये ऑफलाइन परिक्षांबाबत खूप मोठे दडपण असल्यामुळे विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. परंतु आंदोलनामधील नेत्यांनी आंदोलन न करता थेट मंत्रालयात यावे. आपण मिळून यावर चर्चा करू , असं आवाहन गायकवाड यांनी केलं आहे. तसेच विद्यार्थ्यांवर खूप दडपण आणि तणाव आहे.त्यांच्या प्रकृतीची आम्हाला काळजी आहे. वेगवेगळ्या बैठका झाल्या,त्यावर निर्णय होईल. परंतु दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन करू नये , समोरा समोर बसून मार्ग काढू,असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड बोलल्या आहेत.
त्यासोबतच विद्यार्थी म्हणाले लिहिण्याची सवय नाही, त्यामुळे आम्ही अर्धातास वाढवून दिला आहे. याआधीच ऑफलाइन परीक्षा होणार असल्याचं मी सांगितलं होतं, त्यानंतरच हा निर्णय घेतला आहे, असंही वर्षा गायकवाड यांनी स्पष्टपणे सांगितलं. राज्यातील महाविद्यालयांमध्ये ऑफलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. असेही त्यांनी मत मांडले.
गृहमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
विद्यार्थ्यांनी मुंबईत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेरच घोषणाबाजी केली असून आंदोलन करून तोडगा निघणार नाही. आणि विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करणे योग्य नाही. त्यामुळे इतक्या मोठ्या संख्येने लहान मुलांना, विद्यार्थ्यांना रस्त्यावर कोणी उतरवलं याबाबत चौकशीचे आदेशही गृहमंत्र्यांनी दिले आहेत.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा