भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यमहाराष्ट्र

१० जानेवारी पासून तिसरा डोस,
….तर कठोर निर्बंध-राजेश टोपे

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुंबई,वृत्तसंस्था। कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण वेगाने करण्यात येत आहे. केंद्राच्या निर्णयानंतर राज्यात १५ ते १८ या वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्यास सुरुवात केली आहे. तर ६० वर्षांवरील नागरिकांना प्रीकॉशनरी तिसरा डोस देण्यात येणार आहे. येत्या १० जानेवारीपासून तिसर्‍या डोसचे लसीकरण करण्यात येणार आहे. कोरोना रुग्णांचा आकडा वाढला तर कठोर निर्बंध लागू करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असा इशारा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. तसेच राज्यात तिसर्‍या डोसचे लसीकरण सुरू करण्यासाठी राज्य सरकारने तयारी केली असल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील निर्बंधांबाबत महत्वाची माहिती दिली. कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. बाधितांची संख्या आटोक्यात यायला हवी. संसर्ग थांबायला हवा या दृष्टिकोनातून गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले. निर्बंधांबाबत मुख्यमंत्री स्तरावर बैठका होत आहेत. मुख्य सचिव, आरोग्य विभाग, टास्क फोर्ससोबत चर्चा करत असतात. त्यामुळे जी काही मते आहेत ती जाणून घेऊन निर्बंधांबाबत निर्णय घेत असतात. त्यांच्या निर्णयानंतर आदेश जारी करण्यात येतात. मुख्यमंत्री लवकरच सगळा आढावा घेऊन निर्बंधाबाबत निर्णय घेतील. तसेच जर गरज पडली तर कठोर निर्बंधाचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले आहेत.

जी लस घेतली तिचाच तिसरा डोस
१० जानेवारीपासून दोन डोस घेतलेल्या ६० वर्षांवरील लोकांना तिसर्‍या डोसची सुरुवात करण्यात येत आहे. यासाठी प्रत्येक लसीकरण केंद्रावर व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये ज्यांनी कोव्हिशिल्ड घेतली आहे त्यांना कोव्हिशिल्डच लस देण्यात येणार आहे. तसेच कोव्हॅक्सिनचेही असणार आहे. यामध्ये कुठेही अडचण येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. १८ च्या पुढील व्यक्तींसाठी कोव्हिशिल्डचे ६० लाख आणि कोव्हॅक्सिनचे ४० लाख डोस कमी पडत असल्यामुळे या मात्रांची केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांच्याकडे मागणी केली आहे. डोसच्या संख्येत अडचण होणार नाही अधिक लस भारत सरकार देईल, अशी अपेक्षा राजेश टोपे यांनी व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!