तिसऱ्या लाटेच संकट अधिक गडद, विद्यापीठ, कॉलेज बंद की सुरू? उच्चस्तरीय बैठकीत आज फैसला
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई,वृत्तसंस्था। महाराष्ट्रासमोरील कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचं संकट अधिक गडद होत आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज दुपारी 12 वाजता राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरु आणि शिक्षण विभागाच्या अधिकारी, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांची तातडीची बैठक बोलावली आहे. उदय सामंत या बैठकीत विद्यापीठ कार्यक्षेत्रातील कोरोनाची स्थिती आणि इतर बाबींची माहिती घेतील. आजच्या बैठकीत कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालय सुरु ठेवायची की नाही यासदंर्भात निर्णय घेण्यात येणार असल्याचं कळतयं
बैठकीला कोण उपस्थित राहणार
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी बोलावलेल्या बैठकीला राज्यातील विद्यापीठांचे कुलगुरु, शिक्षण विभागाचे अधिकारी, विभागीय आयुक्त,सर्व जिल्हाधिकारी उपस्थित असतील. ही बैठक ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे. आजच्या बैठकीत कोरोनाच्यापरिस्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे. वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुढील शैक्षणिक धोरण काय असावे, याबाबत चर्चा होणार आहे. आजच्या बैठकीत महाविद्यालय आणि विद्यापीठ सुरु राहणार की नाही यासंदर्भातील निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
कुलगुरु आणि शिक्षण विभागाचे अधिकारी अहवाल सादर करणार
ज्यातील कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सध्या सुरु असणाऱ्या परीक्षा, अभ्यासक्रम आणि महाविद्यालय सुरु ठेवण्यासंदर्भात नेमक्या काय उपाययोजना करता येतील, याविषयी बैठकीत चर्चा करण्यात येईल. उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या विद्यापीठांचे कुलगुरु आणि शिक्षण विभागाचे अधिकारी हे आजच्या बैठकीत अहवाल सादर करण्याची शक्यता आहे. हा, अहवाल सादर झाल्यानंतर त्या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करुन निर्णय घेण्यात येणार असल्याचं कळतंय.