“….तर राज्यात पुन्हा लॉकडाउन” लागू शकतो, मुख्यमंत्र्यांचा इशारा
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई (वृत्तसंस्था)। देशात आज सर्वत्र स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत, कोरोना परिस्थितीचा अंदाज व्यक्त केला. राज्यात निर्बंध शिथिल करण्यात येत असले, तरी कोरोनाविषयीचे नियम पाळण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. जर परिस्थिती बिघडली, तर राज्यात पुन्हा लॉकडाउन लागू करावा लागू शकतो, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ‘स्वातंत्र्याचा इतिहास फक्त लक्षात ठेवून आपण स्वातंत्र्यदिन साजरा करतो, पण ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं त्या स्वातंत्र्याची जपणूक करणं आपली जबाबदारी आहे. गेल्या एक वर्षांपासून आपण कोरोना व्हायरसचा सामना करत आहोत. हे वेगळ पारतंत्र्य फक्त आपणचं नाही तर संपूर्ण जग अनुभवत आहे.’ ‘त्यातूनही मुक्त होण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. उद्या १६ ऑगस्ट आहे. आपण अनेक बंधनांमध्ये शिथिलता आणली आहे. पण कोरोनाचं संकट अद्याप टळलेलं नाही. परदेशात काही ठिकणी पुन्हा कोरोना संकट उसळलं आहे. आपल्याकडे ते उसळू नये म्हणून आपल्याला खबरदारी घ्यायची आहे. आपण निर्बंधांमध्ये शिथिलता दिली आहे.
पुढे मुख्यमंत्री म्हणाले, ‘पण त्याचं बरोबर आपण इशाराही दिला आहे. कोरोनाचा कहर आपण दोन्ही वर्षी अनुभवला आहे. शिथिलता दिली असली तरी नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यास पुन्हा लॉकडाऊन लागू शकेल. लॉकडाऊन नको असल्यास सर्वांनी खबरदारी घेतली तर आपण त्यातून नक्कीचं बाहेर पडू.’ असं मुख्यमंत्री म्हणाले.