भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

शिवसेनेसोबत कोणतीही चर्चा सुरू नाही, फडणवीसांचे मोठे विधान

मुंबई (वृत्तसंस्था): शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यासोबत झालेल्या बैठकीवर अखेर भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला आहे. ‘मुलाखतीसाठी राऊत यांची भेट झाली होती, त्याचा राजकीय अर्थ काढला गेला’, असं फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

‘संजय राऊत यांनी माझी मुलाखत घेणार हे जाहीर केले होते. त्यानंतर त्यांचा फोन आला होता. त्यामुळे मी काही अटी टाकल्या होत्या. त्यामुळे चर्चा करण्यासाठी राऊत यांची भेट झाली. या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही आणि कारणही नाही’, असं स्पष्ट खुलासा फडणवीस यांनी केला आहे. ANI या वृत्तसंस्थेशी बोलत असताना फडणवीस यांनी राऊत यांच्या भेटीबद्दल आणि महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराबद्दल स्पष्ट भाष्य केले आहे.

‘शिवसेनेसोबत कोणतीही चर्चा सुरू नाही, त्यांच्यासोबत सरकार स्थापन करण्याची कोणतीही चर्चा केली नाही. त्यासाठी असे कोणतेही कारण नाही, जे सरकारचे काम सुरू आहे. त्यावर जनतेमध्ये प्रचंड आक्रोश आहे. त्यामुळे हे सरकार आपल्या कृतीमुळे कोसळेल, ज्यावेळी हे सरकार पडेल त्यावेळी आम्ही बघू पण सरकार बनवण्याची कोणतीही घाई भाजपला नाही, असंही फडणवीस यांनी स्पष्ट केले. दरम्यान, त्याआधी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन फडणवीस यांच्यासोबत भेटीबद्दल खुलासा केला आहे. ‘देवेंद्र फडणीस हे राज्याचे विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री आहे. त्यामुळे त्यांना भेटणे हे काही गुप्तपणे नाही. ही काही बंकरमध्ये भेट नव्हती. त्यांच्याशी बऱ्याच दिवसांपासून भेटण्याचा विचार होता. त्यांची जाहीरपणे मुलाखत घेण्याचा विचार होता. याआधीही शरद पवार यांचीही मुलाखत घेण्याचा विचार होता. पण कोरोनाच्या काळामुळे ती झाली नाही. आता फडणवीस यांची मुलाखत घेण्याचा विषय आला आहे.  महाराष्ट्रातील काही साहित्यिक संस्था आहे. त्यांनीही फडणवीस यांची प्रकट मुलाखत घ्यावी असा आग्रह केला आहे, असंही राऊत यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!