भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

राजकीयराष्ट्रीय

पवारांना सांगितलं, लोकसभेच्या 400 जागांवर भाजपला मात कशी देता येऊ शकते?प्रशांत किशोर यांनी टॉप सिक्रेट!

Monday To Monday NewsNetwork।

मुंबई(वृत्तसंस्था)। राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी तब्बल साडेतीन तास चर्चा केली. ही अत्यंत सिक्रेट मिटींग होती. या बैठकीत भाजपला पर्याय म्हणून तिसरी आघाडी स्थापन करण्यासह भाजपला मात देण्यासाठीच्या व्यूहरचनेवरही चर्चा झाली. एवढेच नव्हे तर भाजपला मात कशी देता येईल?, भाजपविरोधी सर्व पक्षांना एकत्र कसे आणता येईल? भाजपविरोधात उभे ठाकण्याचा समान धागा काय असू शकतो, याचं सादरीकरणच प्रशांत किशोर यांनी पवारांना दिल्याचं सूत्रांनी सांगितलं.

या अत्यंत महत्त्वाच्या भेटीत प्रशांत किशोर यांनी भाजपला लोकसभा निवडणुकीत 400 जागांवर मात देता येऊ शकत असल्याचं दाखवून दिलं आहे. त्या जागा कोणत्या, कोणत्या राज्यात किती जागा आहेत, त्या राज्यात कोणते प्रादेशिक पक्ष मोठी भूमिका बजावू शकतात, याची आकडेवारीच प्रशांत किशोर यांनी पवारांना दिली आहे. तसेच एकट्याच्या बळावर काँग्रेस भाजपला हरवू शकत नाही, हे वास्तव आहे. त्यामुळे प्रादेशिक पक्षांना एकत्र घेऊन चालल्याशिवाय पर्याय नाही, असंही त्यांनी या बैठकीत पवारांना सांगितल्याचं सूत्रांनी सांगितलं. देशपातळीवर भाजपविरोधात विरोधकांनी एकत्र येण्याचा फॉर्म्युला काय असेल तसे न घडल्यास राज्य पातळीवर विरोधकांनी एकत्र येण्याचा फॉर्म्युला काय असावा याची माहितीही त्यांनी पवारांना दिल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.

प्रादेशिक पक्षांशी संवाद साधा
प्रशांत किशोर यांनी भाजपविरोधात प्रादेशिक पक्षांना एकत्रित आणण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू केला आहे. त्यांनी पवारांनाही प्रादेशिक पक्षांशी संवाद साधून त्यांना एकत्रित आणण्याचा सल्ला दिला आहे. तसेच या वेळी बंगालच्या राजकारणावरही चर्चा झाली. मोदींची लाट असताना आणि भाजप बंगालमध्ये वातावरण निर्मिती करण्यात यशस्वी झालेला असतानाही ममता बॅनर्जी यांनी विजय कसा खेचून आणला, त्यासाठी काय रणनीती वापरली याची माहितीही त्यांनी पवारांना दिली आहे.

आघाडीवर जोर
शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट तर्कवितर्क लढवले जात आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही महिन्यांपूर्वीच पवार-प्रशांत किशोर यांची भेट होणार होती. मात्र, काही कारणास्तव ही भेट झाली नाही. मात्र, काल झालेल्या भेटीत अनेक विषयांवर चर्चा झाली आहे. परंतु, भाजपविरोधात राष्ट्रीय स्तरावर मोठी आघाडी निर्माण व्हावी यावर या भेटीत अधिक जोर देण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!