बारावीचा मूल्यमापनाचा फॉर्म्युला ठरला : लवकरच निकालाची तारीख
Monday To Monday NewsNetwork।
पुणे(वृत्तसंस्था)। राज्यातील बारावीचे सुमारे १४ लाख विद्यार्थी व त्यांचे पालक डोळे लावून बसलेल्या मूल्यमापन पद्धतीचा फार्म्युला राज्य सरकारने आज अखेर जाहीर केला. दहावीत सर्वाधिक गुण मिळालेल्या तीन विषयांचे सरासरी ३० टक्के गुण, अकरावीचे सरासरी ३० टक्के गुण तसेच बारावीच्या वर्षभरातील कामगिरीवर आधारीत ४० गुण गृहीत धरण्यात येणार आहेत.
सीबीएसईच्या धर्तीवर ही मूल्यमापन पद्धती आंमलात आणली जाणार आहे. दहावी-अकरावीचे प्रत्येकी सरासरी ३० टक्के गुण गृहीत धरले जाणार आहेत. बारावीच्या वर्षभरातील अंतर्गत मूल्यमाप्नातील प्रथम सत्र, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन यातील विषय निहाय 40 टक्के गुण धरून १०० पैकी गुण दिले जाणार आहेत. सीबीएसईचा बारावीचा निकाल या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्य मंडळाचा निर्णय आज झाल्याने येत्या काही दिवसात निकालाची तारीखदेखील जाहीर करण्यात येईल, असे शिक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले.
बारावीतील विद्यार्थ्यांची संख्या चौदा लाखांच्या आसपास आहे. मूल्यमापनाला किती वेळ लागेल याचा अंदाज घेऊन निकालाची तारीख जाहीर करण्यात येणार आहे. या महिनाअखेर निकाल लावण्याचा राज्य मंडळाचा प्रयत्न असल्याचे या सूत्रांनी सांगितले.