भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यमहाराष्ट्रशैक्षणिक

विद्यापीठ, कॉलेज सुरु की बंद ? कुलगुरु आणि शिक्षण विभागाची तातडीची बैठक – उदय सामंत

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुंबई,वृत्तसंस्था। महाराष्ट्रासमोर कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचं संकट उभं राहिलं आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरु आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. उदय सामंत यांनी या बैठकीत विद्यापीठ कार्यक्षेत्रातील कोरोनाची स्थिती आणि इतर बाबींची माहिती घेतली. उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी विद्यापीठांच्या कुलुगुरुंकडून अहवाल मागवला असून त्यानंतर महाविद्यालय सुरु ठेवायची की नाही यासदंर्भात निर्णय घेण्यात येणार असल्याचं कळतयं.

कुलगुरुंच्या अहवालानंतर निर्णय घेणार
महाराष्ट्रात ओमिक्रॉन दुपटीनंन वाढतं आहे. राज्याच्या उच्च तंत्रशिक्षण विभागाला याचा विचार करावा लागेल, असं उदय सामंत म्हणाले. येत्या 3 तारखेला कुलगुरूंची आणखी एक बैठक होण्याची शक्यता आहे. विद्यापीठाच्या कुलगुरुंकडून जो अहवाल येईल त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करत निर्णय घेऊ, असं उदय सामंत म्हणाले आहेत. राज्यातील कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सध्या सुरु असणाऱ्या परीक्षा, अभ्यासक्रम आणि महाविद्यालय सुरु ठेवण्यासंदर्भात नेमक्या काय उपाययोजना करता येतील, याविषयी बैठकीत चर्चा करण्यात आली. महाविद्यालयातील कर्मचारी, प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्या लसीकरणासंदर्भात चर्चा करण्यात आली.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं संकट, महाविद्यालय सुरु राहणार की बंद?
मुंबईसह राज्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झालीय. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ आणि महाविद्यालय सुरु ठेवायची की नाही याबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी आढावा घेतला.

बैठकीला कोण कोण उपस्थित?
अकृषी विद्यापीठातील कोविड 19 आणि ओमायक्रॉन’च्या पार्श्वभूमीवर तातडीची बैठक घेण्यात आली. यावेळी, प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उच्च शिक्षण संचालक धनराज माने, तंत्र शिक्षण संचालक अभय वाघ, अकृषी विद्यापीठांचे सर्व कुलगुरू व संबंधित उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!