विद्यापीठांच्या परीक्षा ऑफलाईन की ऑनलाईन ?
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई,वृत्तसंस्था। उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महाराष्ट्रात 10 कोटी लसीकरण झाल्याचं सांगितलं. कॉलेज सुरु करत असताना दोन्ही डोसची अट ठेवण्यात आली होती. यातून अनेक विद्यार्थी लसीकरणापासून वंचित असल्याचं समोर आलं होत. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून महाविद्यालयात लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. मुंबईत आज 55 ठिकाणी लसीकरण करण्यात येतंय. राज्यात ठिकठिकाणी लस देण्यात येत आहेत, अशी माहिती उदय सामंत म्हणाले. ऑफलाईन वर्ग सुरु करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. ज्या ठिकाणी अडचण असेल त्या ठिकाणी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल, असं उदय सामंत यांनी म्हटलं.
परीक्षा ऑफलाईन घेणार
विषाणू संसर्गामुळं गेल्यावर्षी ऑनलाईन परीक्षा घ्याव्या लागल्या होत्या. मात्र, यंदा लसीकरण करण्यात येत असून आम्ही ऑफलाईन परीक्षा घेणार आहोत. त्यामुळं विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षा देण्यासाठी मानसिकता तयार करावी, असं उदय सामंत म्हणाले.
मिशन महाविद्यालय लसीकरण मोहिमेचं उद्घाटन
राज्यातील महाविद्यालय 100% ऑफलाइन सुरू करण्यासंदर्भात मिशन महाविद्यालय विद्यार्थ्यांचं लसीकरण मोहीम सुरु केली आहेत. या लसीकरण मोहिमेमुळे महाविद्यालयातील ऑफलाईन वर्ग सुरू होतील आणि यंदा परीक्षा ही ऑफलाईन घेता येऊ शकेल, असा आम्हाला विश्वास वाटतो अशी माहिती उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिलीय. मिशन महाविद्यालय लसीकरण मोहिमेचं उद्घाटन आज वांद्र्यातील एम एम के महाविद्यालयात झालं. या मिशन अंतर्गत आठ दिवसात 40 लाख विद्यार्थ्यांचा लसीकरण मोहीम पूर्ण करण्याचा टप्पा आखण्यात आला आहे.