सावधान : देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात,ओमिक्रॉनमुळे चिंता वाढतेय
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई,वृत्तसंस्था। महाराष्ट्र राज्यात पुन्हा ८ नव्या ओमिक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. काल दिनांक १४ डिसेंबर २०२१ रोजी नवे ८ रुग्ण आढळून आल्याने राज्यात ओमिक्रॉनमुळे चिंता वाढताना दिसत आहे. आता राज्यातील एकूण ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या २८ वर पोहोचली आहे.दरम्यान देशात सर्वाधिक ओमिक्रॉन रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत.
काल नव्याने आढळून आलेल्या ८ रुग्णांमध्ये ३ महिला असून ५ पुरुष आहेत. तसेच ३ रुग्ण लक्षणे विरहित असून ५ रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे दिसून आली आहेत.
8 more patients found infected with #Omicron in the state. Out of these 7 are from Mumbai & 1 patient is from Vasai Virar. Till date, a total of 28 patients infected with Omicron have been reported in the state. Out of these, 9 have been discharged after negative RT-PCR test. pic.twitter.com/AptIVHMk8h
— ANI (@ANI) December 14, 2021
राज्यात दिवसभरात ८ जणांचा ओमिक्रॉन अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ८ रुग्णांपैकी ७ जण मुंबईतच सापडले आहेत. राज्यात ओमिक्रॉनच्या एकूण रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. हा आकडा एकूण २८ वर पोहोचला आहे. दरम्यान, ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका वाढत गेले तर महाराष्ट्रात लॉकडाऊन देखील लागू शकतो.
आतापर्यंत मुंबईत १२, चिंचवडमध्ये १०, पुण्यात २ आणि डोंबिवलीत एक रुग्ण आढळून आला आहे. ज्यांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे. त्यामुळे आता ही रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवून पुन्हा एकदा लॉकडाऊनची परिस्थिती उद्भवणार नाही याची काळजी ठाकरे सरकारला घ्यावी लागणार आहे. राज्य सरकारने आपल्या वतीने विमानतळावर निश्चितच कठोर नियम केले आहेत, जोखीम असलेल्या देशांसाठी क्वारंटाईनबाबतही सांगण्यात आले आहे. परंतु तरीही महाराष्ट्रातच सर्वाधिक रुग्ण समोर येत आहेत. महाराष्ट्राव्यतिरिक्त आता दिल्ली, राजस्थानमध्येही ओमिक्रॉनचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याचं दिसून येत आहे.
राजधानी दिल्लीत ओमिक्रॉनचे चार नवे रुग्ण आढळून आले असून, राजधानीत ओमिक्रॉनने संक्रमित रुग्णांची एकूण संख्या ६ झाली आहे. राजस्थानमध्येही १४ डिसेंबरला चार रुग्ण ओमिक्रॉन पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. तिथेही या नव्या व्हेरिएंटने सरकारला चिंतेत टाकले आहे. देशातील एकूण आकडेवारीबद्दल बोलायचे झाले तर आतापर्यंत ६१ रुग्ण आढळून आले आहेत. ज्यांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे. सरकारकडून सातत्याने माहिती दिली जात आहे. तसेच लसीकरणाला गती देण्यावरही भर दिला जात आहे. मात्र दरम्यान, देशात ओमिक्रॉनचा धोकाही वेगाने पसरत आहे.
चीनने यापूर्वीच सोमवारी उत्तरेकडील तियानजिन शहरात ओमिक्रॉन स्ट्रेनची आढळल्याची पुष्टी केली होती. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सुद्धा ओमिक्रॉन संसर्गामुळे देशातील पहिल्या मृत्यूची पबातमी दिली होती. ओमिक्रॉन स्ट्रेनचा प्रसार “आश्चर्यकारक दराने” होत आहे आणि लंडनमध्ये सुमारे ४० टक्के संसर्ग होतो आहे.
दरम्यान नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यातदिल्ली सरकार देखील निर्बंध घालू शकते असे संकेत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिले आहे.