सावधान: राज्यातील या ‘२४’ जिल्ह्यात आहेत डेल्टा प्लस व्हेरिएंट रुग्ण,जळगाव जिल्ह्याचा समावेश
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई ,मंडे टू मंडे वृत्तसेवा। राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आली आहे. मात्र देशात कोरोनाची तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. याच दरम्यान राज्यात गेल्या काही दिवसांपासून आटोक्यात असलेली कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आज अचानक वाढली आहे. तसेच कोरोना व्हायरसचा,डेल्टा व्हेरिएंटचाही प्रार्दुभाव वाढू लागला आहे. राज्यातल्या 24 जिल्ह्यांमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंटने डोके वर काढले आहे.
राज्यातील 24 जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या डेल्टा पल्स व्हेरिएंटचा प्रार्दुभाव वाढ असून सर्वाधिक रुग्ण हे रत्नागिरी आणि जळगाव जिल्ह्यामध्ये आढळले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे या जिल्ह्यांमध्ये सद्यस्थितीत बाधितांचे प्रमाण वाढलेले नाही. त्यामुळे डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या प्रसाराचा वेग हा डेल्टाच्या तुलनेत कमी आहे.
दरम्यान नव्याने 27 डेल्टा प्लस व्हेरिएंट बाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे राज्यातील रुग्णांची संख्या 103 वर गेली आहे. जिनोम सिक्वेन्सिंग चाचण्यांमधून आता एकूण 24 जिल्ह्यांमध्ये याचा प्रादुर्भाव असल्याचे निदर्शनास आले आहे. विदर्भ आणि कोकण विभागात 50 टक्के रुग्ण आढळून आले आहेत.
जिल्ह्यानुसार डेल्टा प्लस व्हेरिएंट रुग्णांची आकडेवारी
जळगाव –13,रत्नागिरी- 15,मुंबई-11, कोल्हापूर-7, ठाणे- 6, पुणे- 6, अमरावती- 6,गडचिरोली- 6, नागपूर- 5, अहमदनगर- 4, पालघर- 3, रायगड- 3, अमरावती- 3, नांदेड- 2, गोंदिया- 2 सिंधुदुर्ग- 2, नाशिक- 2,चंद्रपूर- 1, अकोला- 1,सांगली- 1,नंदुरबार- 1, औरंगाबाद- 1,बीड- 1, भंडारा -1