आज सोमवार पासून राज्यातील इंग्रजी शाळा सुरु होणार ? मेस्टाचा निर्णय
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई,वृत्तसंस्था। राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र आता शाळा सुरु कराव्यात, अशी आग्रही आणि तीव्र मागणी पालक वर्गाकडून करण्यात येत आहे. मात्र राज्य सरकार विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ करायचा नाहीये. त्यामुळे सरकार अद्याप शाळा सुरु करण्याच्या विचारात नाही. मात्र दुसऱ्या बाजूला इंग्लिश स्कूल असोसिएशनने आक्रमक भूमिका घेतली आहे.
राज्य सरकारचा बंदीचा आदेश झुगारून राज्यातील इंग्रजी शाळा उद्या (सोमवार 17 जानेवारी) सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन अर्थात मेस्टाच मेस्टानं घेतला आहे.
शाळा सुरु करण्यासाठी आक्रमक का?
“शाळा बंद असल्यानं मुलांचं नुकसान होत असल्याचं इंग्रजी शाळांच्या संघटनेचं म्हणणं आहे. त्यामुळे राज्यातील संघटनेशी संलग्न असलेल्या 18 हजार शाळा उघडण्यात येतीलठ, असं मेस्टाचे अध्यक्ष संजय तायडे यांनी जाहीर केलं आहे.
आरोग्यमंत्र्याचं म्हणंन काय?
एकीकडे शाळा सुरू करण्यासाठी मेस्टा संघटना आग्रही आहे तर दुसरीकडे राज्यातील शाळा लवकरच सुरु करण्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. 15 दिवसांनी आढावा घेऊन निर्णय घेऊ असं राजेश टोपेंनी म्हंटलंय. रुग्ण नसलेल्या भागात 50%क्षमतेनं शाळा सुरु करण्याची याव्यात अशी मागणी होतेय. त्यामुळे आता नेमकं काय होणाल, याकडे राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे.