आरोग्यमहाराष्ट्र

सावधान ; मुंबईत ओमायक्रॉनचे २ रुग्ण आढळले,राज्यातील रुग्णसंख्या १० वर

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुंबई,वृत्तसंस्था। मुंबईत ओमायक्रॉनचे व्हेरियंटचे २ रुग्ण आढळले असून बाधित रुग्ण हा दक्षिण आफ्रिकेतून २५ नोव्हेंबरला मुंबईत आलेल्या ३७ वर्षीय प्रवाशाला ओमायक्रॉनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.राज्यात सुरुवातीला या नव्या व्हेरिएंटचे २ रुग्ण आढळले होते मात्र आता राज्यात ओमायक्रॉनचा(Omicron) दहावा रुग्ण सापडला आहे, त्यामुळे भारताची चिंता वाढली आहे.

मुंबईत आढळून आलेला रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे २९ नोव्हेंबर रोजी आढळले होते. त्यामुळे त्याचे नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठविण्यात आले. त्यामध्ये त्याला ओमायक्रॉनची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

दरम्यान, शनिवारी डोंबिवलीत राज्यातील पहिला ओमायक्रॉन रुग्ण आढळला होता. त्यानंतर पिंपरीतील सहा आणि पुण्यातील एकाला ओमायक्रॉनची लागण झाल्याचे समोर आले होते. आता अजून दोन रुग्णांची भर पडल्याने राज्यातील रुग्णसंख्या १० वर पोहोचली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!