भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीयआरोग्य

चिंताजनक ! ओमायक्रॉनचा पहिला बळी ब्रिटनमध्ये,महाराष्ट्रात ओमायक्रॉन रुग्ण संख्या २० वर

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुंबई,वृत्तसंस्था। कोरोनानंतर जगभरात ओमायक्रॉनचा धसका वाढलेला असताना सर्वच देशांनी आपापल्या आरोग्य यंत्रणा अद्ययावत करताना ओमायक्रॉनला अटकाव करण्यासाठी काही उपाययोजना केल्या होत्या. मात्र, ओमायक्रॉनचा संसर्ग वाढल्याबाबत तीन आठवड्यापूर्वी सर्व देशांना अलर्ट देण्यात आला होता. ब्रिटनमध्ये ओमायक्रॉन विषाणूचा पहिला मृत्यू झाल्याबाबत स्वत: ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सोमवारी माहिती दिली. ओमायक्रॉनमुळे शेकडो लोकांना रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. 30 पेक्षा अधिक वयाच्या लोकांनी कोरोना वॅक्सिनचा बुस्टर डोस घ्यावा, असे आवाहन करतानाच ओमायक्रॉनकडे जराही दुर्लक्ष करू नका, असा सावधतेचा इशाराही पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी दिला आहे.

पश्चिम लंडनच्या पॅडिंगटनमध्ये लसीकरणाच्या वेळी पंतप्रधान जॉन्सन यांनी ही माहिती दिली. ओमायक्रॉनचा संसर्ग होत असल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. ओमायक्रॉनमुळे एका रुग्णाचा मृत्यूही झाला आहे, असे जॉन्सन यांनी सांगितले.

ओमायक्रॉनचा संसर्ग वाढू लागल्याने ब्रिटनमध्येच नागरिकांना बुस्टर डोस दिला जात आहे. 30 वर्षांवरील व्यक्तींना हे बुस्टर डोस दिले जात आहेत. देशात ओमायक्रॉनचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर फैलावत आहे. त्यामुळे हा संसर्ग रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे, अशी माहिती ब्रिटनच्या आरोग्य अधिकार्‍याने दिली. इंग्लंडच्या राष्ट्रीय आरोग्य सेवा विभागाच्या मते, देशात 30 ते 39 वयोगटातील 75 लाख लोक आहेत. त्यामध्ये 35 लाख लोकांना आजपासून बुस्टर डोस देण्यात येणार आहे.

या वर्षाच्या अखेरपर्यंत ओमायक्रॉनचा संसर्ग डेल्टा व्हेरिएंटला मागे टाकेल, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. कोविड 19 बुस्टर डोसचा कार्यक्रम वेगाने राबवला जात आहे. ब्रिटनमध्ये आतापर्यंत 2.2 कोटी लोकांना बुस्टर डोस देण्यात आला आहे, असे ब्रिटनचे आरोग्य मंत्री साजिद जावेद यांनी सांगितले.

महाराष्ट्रात ओमायक्रॉन बाधितांची संख्या २० वर
सोमवारी लातूर आणि पुण्यात ओमायक्रॉनचा प्रत्येकी एक रुग्ण आढळल्यामुळे आता राज्यात ओमायक्रॉनबाधितांची संख्या २० वर गेली आहे. मुंबई-५, पिंपरी-चिंचवड-१०, पुणे-२, कल्याण-डोंबिवली-१, नागपूर -१ आणि लातूर -१ असे ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. सोमवारी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार राज्यात आणखी २ रुग्ण ओमायक्रॉनबाधित आढळले आहेत. यापैकी एक रुग्ण पुणे येथील आणि एक रुग्ण लातूर येथील आहे. हे दोन्ही रुग्ण लक्षणेविरहित आहेत. त्यापैकी पुण्यात आढळलेला रुग्ण ३९ वर्षांची महिला असून लातूरमधील रुग्ण ३३ वर्षीय पुरुष आहे. हे दोन्ही रुग्ण दुबईहून राज्यात आलेले आहेत. दोघांनीही लसीचे दोन डोस घेतलेले आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!