भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीयआरोग्य

ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे आपण सध्या डेंजर झोनमध्ये ! टास्क फोर्सचे डॉ. पॉल यांचा इशारा

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुंबई,वृत्तसंस्था। कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे आपण सध्या डेंजर झोनमध्ये आहोत. मात्र, भारतात मास्क घालण्याचे प्रमाण हळूहळू कमी होऊ लागले आहे. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की लस आणि मास्क या दोन्ही बाबी महत्वाच्या आहेत. आपण जागतिक परिस्थितीपासून शिकायला हवे. अतिशय जोखमीच्या आणि अस्वीकारार्ह अशा पद्धतीने वर्तणूक होऊ लागली आहे, अशी चिंता नीती आयोग आणि कोरोनाबाबतच्या टास्क फोर्सचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी व्यक्त केली आहे.

आरोग्य विभागाने शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. व्ही. के. पॉल यांनी ओमायक्रॉन व्हेरिएंटचा प्रसार आणि भारतीयांकडून कोरोनाच्या नियमांकडे होणारे दुर्लक्ष यावर भाष्य करताना चिंता व्यक्त केली आहे. डॉ. व्ही. के. पॉल यांनी देशवासीयांना मास्क न काढण्याचे आवाहन केले आहे. जागतिक आरोग्य संघटना सातत्याने मास्कचा वापर कमी होत असल्याबद्दल सतर्क करत आहे. ओमायक्रॉनचा जागतिक पातळीवर वेगाने होणारा प्रसार चिंता वाढवणारा आहे. मास्क आणि लस या दोन्ही गोष्टी महत्वाच्या असून अद्याप मास्क काढण्याची वेळ आलेली नाही, असे त्यांनी नमूद केले.

डॉ. पॉल यांनी कोरोनाच्या साथीमध्ये अनेक सरप्राईजेस असल्याचेही सांगितले आहे. ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे ब्रिटन आणि फ्रान्समध्ये कोरोनाची मोठी लाट आली आहे. कोरोनाच्या विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत खूप सार्‍या अनपेक्षित गोष्टी घडत आहेत. त्यामुळे स्वत:ची काळजी घेणे फार आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. जगभरात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे भितीचे वातावरण आहे. हा व्हेरिएंट आधीच्या डेल्टा किंवा डेल्टा प्लसपेक्षा कमी घातक असल्याचे जरी बोलले जात असले, तरी अद्याप त्याचा पूर्ण अभ्यास होणे बाकी असल्यामुळे शास्त्रज्ञ आणि संशोधक अजूनही छातीठोकपणे निर्धोक राहण्याचा सल्ला देत नाहीत. दुसरीकडे व्यापक लसीकरण झाल्यामुळे लोकांमध्ये कोरोनाबाबतच्या नियमाकडे काहीसे दुर्लक्ष करण्याची वृत्ती दिसून येऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीयांना नीती आयोग आणि कोरोनाबाबतच्या टास्क फोर्सचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी गंभीर इशारा दिला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!