क्राईममुक्ताईनगर

मुक्ताईनगर तालुक्यातील मधापुरी येथे मुंबईच्या युवकांची साडेचार लाखांची लूट

मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी l बीमुक्ताईनगर तालुक्यातील मधापुरी येथे दिनांक 10 फेब्रुवारी 2025 रोजी 1 एक लाख रुपये च्या मोबदल्यात 4000 डॉलर देण्याच्या बहाण्याने बोलावत चौघांसह अज्ञात सात व्यक्तींनी मुंबई येथील तरुणांची अक्षरशः जबरी लूट करत मारहाण केली व 4 लाख 44 हजार रुपयांचा मुद्देमालासह रोख रक्कम हिसकावून घेतली.

याबाबत मुक्ताईनगर पोलिसात फिर्यादी हर्ष प्रमोद पाटील व 21 धंदा शिक्षण राहणार आशीर्वाद बंगलो, नवाळे रोड, नालासोपारा वेस्ट, तालुका वसई जिल्हा ठाणे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दिनांक 10 फेब्रुवारी रोजी फिर्यादी व फिर्यादीचा मित्र मॅक्सवेल जॉन डायस व मनीष राज नारायण सिंग अशांना आरोपी प्रेम विजय पवार, सूर्या पूर्ण नाव माहित नाही, राजेश्वर पवार पूर्ण नाव माहित नाही, रूपाली पूर्ण नाव माहित नाही व इतर 6 ते 7 अज्ञात व्यक्ती यांनी इंस्टाग्राम द्वारे 1 लाख रुपयांच्या बदल्यात 4 हजार डॉलर देण्याचे अमिष दाखवून त्यांना मधापुरी तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव येथे बोलावून त्यांना प्लास्टिकचे पाईपने व लाकडी काठ्यांनी मारहाण करून मारून टाकण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून वस्तू मोबाईल फोन बळजबरीने हिसकावून घेतले म्हणून मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपी यांनी हर्ष प्रमोद पाटील याचे गुगल पे अकाउंट वरून एक लाख 41 हजार रुपये व दहा हजार रुपये रोख मॅक्सवेल जॉन डायस याचे खिशातील 7000 रुपये रोख,तसेच मॅक्सवेल याच्या मालकीची दहा ग्रॅम वजनाची 70 हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी, तीन ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बाळी 21 हजार रुपये किमतीची,पाच हजार रुपये किमतीचा रियल मी नोट प्रो मोबाइल, तीस हजार रुपये किमतीचा रेडमी नोट प्रो प्लस मोबाईल, 100000 रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल तसेच 20000 रुपये किमतीचा रियल मी एक्स सेवन मोबाईल व 40000 रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीची घड्याळ मॅक्सवेल जॉन याच्या हातातील असा एकूण 4 लाख 44 हजार रुपये किमतीचा रोख व मुद्देमाल या चोरट्यांनी हिस्कावून घेतला आहे. या मारहाणीत फिर्यादी स्वतः जखमी झालेला असून मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला दाखल झालेल्या फिर्यादीवरून सहायक पोलीस निरीक्षक जयेश पाटील तपास करत आहे. दरम्यान पोलीस निरीक्षक नागेश मोहिते पोलीस उपविभागीय अधिकारी राजकुमार शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली असून अद्याप आरोपी फरार आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!