Breaking ; घरगुती गॅसच्या किमतीत वाढ, एक सिलिंडर 50 रुपयांनी महागला
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। कडक उन्हा प्रमाणे जनतेला महागाईचे चटके बसत असताना ,महागाईचा आणखी एक मोठा धक्का बसला आहे.पेट्रोल डिझेल च्या किमतीसह इतरही वस्तूंच्या किमतीत वाढ होत असताना आता 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरचे दर 50 रुपयांनी वाढवण्यात आले आहेत. आजपासून घरगुतील सिलिंडरचे दर प्रति सिलिंडर 999.50 रुपयांवर पोहोचले आहेत. एक मे रोजी व्यवसायिक सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली होती. त्या पाठोपाठ आता घरगुती सिलिंडरचे दर देखील वाढवण्यात आले आहेत.