भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रसामाजिक

हृदयस्पर्शी दुःखद घटना ; पत्नीच्या निरोप समारंभात पतीचा मृत्यू

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। प्राचार्य पदावरुन सेवानिवृत्त झालेल्या पत्नीच्या सत्कार सोहळ्यादरम्यान पतीला भोवळ आली आणि सर्वांच्या डोळ्यादेखत प्राणज्योत मालवली. यवतमाळमधील या प्रसंगाने शेकडो उपस्थितांचे मन हेलावून टाकलं आणि समारंभावर दुःखाच सावट पसरलं.

गुरुवारी सात एप्रिल रोजी दुपारी यवतमळ मधील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या सभागृहात पत्नीच्या सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

डॉ. रेखा महाजन या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत (डाएट) प्राचार्य होत्या. ३१ मार्च रोजी त्या सेवानिवृत्त झाल्या,त्या निमित्तानं कर्मचाऱ्यांनी ७ एप्रिल रोजी त्याचा निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित केला ,तेव्हा डॉ रेखा महाजन त्यांचे पती निवृत्त कृषी अधिकारी विकास महाजन.रा. आर्णी नाका परिसर, यवतमाळ, या दोघांच्या हस्ते जिल्ह्यातील पीएचडी प्राप्त शिक्षाकांचा सत्कार करण्यात आला, विकास महाजन यांनी उपस्थितांना मार्गदर्शनही केले,समारंभ मोठ्या उत्साहात सुरू होता, भाषणानंतर ते मंचावर बसलेले असताना त्यांना अचानक भोवळ येऊन ते खाली पडले उपस्थितांनी त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात नेलं मात्र वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. यावेळी कार्यक्रमाला महाजन दाम्पत्याच्या दोन मुली, मुलगा यासह विशेष म्हणजे, आजी आणि आजोबांचा सत्कार पाहण्यासाठी त्यांची नातवंडेही आली होती. मात्र सत्काराच्या आनंद सोहळ्यात सर्वांच्या डोळ्यादेखत विकास महाजन यांचा अचानक मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसर व महाजन कुटुंब शोकसागरात बुडालं.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!