पोषण आहाराच्या खिचडीत पालीचे तुकडे, चाळीस विद्यार्थ्यांना विषबाधा
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। शासनाकडून देण्यात येणाऱ्या पोषण आहाराबाबत राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहाराच्या खिचडीत पालीचे तुकडे आढळून आले. ही खिचडी खाल्ल्यामुळे तब्बल 40 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली असून या प्रकारामुळे शाळेत खळबळ माजली.
उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील पेठसावंगी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आज मंगळवारी सकाळी ही घटना घडली. मुलांनी शाळेतील खिचडी डब्यात भरून घरी नेली होती. तेव्हा एका मुलाच्या डब्यात पालीचे मुंडके तर एकाच्या डब्यात पालीच्या शरीराचा मागील भाग आढळून आला. पालकांनी तत्काळ शाळेत येऊन शिक्षकांना या प्रकाराबाबत माहिती दिली. मात्र तोपर्यंत अनेक विद्यार्थ्यांना खिचडीचे वाटप झाले होते. अनेक विद्यार्थ्यांना विषबाधा होऊन त्रास सुरु झाला होता. दरम्यान, विद्यार्थ्यांची प्रकृती आता स्थिर असून पालक, शिक्षक आणि डॉक्टरांनी एकत्र येऊन उपाययोजना केल्याने मोठं संकट टळल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना ही खिचडी खाल्ल्यामुळे उलटी, मळमळ, डोके दुखणे, चक्कर येणे असा त्रास सुरप झाला. काही पालकांनी शाळेत धाव घेत या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांना नांगरवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आळे. 18 विद्यार्थ्यांना रुग्णवाहिकेतून उमरगा येथे उपचारासाठी पाठवण्यात आले. तर काहींना सौम्य त्रास होत असल्याने नाईचाकुर येथील डॉक्टरांची टीम बोलावून शाळेतील एका रुमममध्ये विद्यार्थ्यांवर उपचार करण्यात आले. मात्र खिचडीची मर्यादा जास्त असल्याने पालीचे विष जास्त पसरले नसल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.जवळपास 248 जणांना या खिचडीचे वाटप करण्यात आले होते. त्या पैकी 40 विध्यार्थ्यांना विष बाधा झली,मात्र खिचडीची मर्यादा जास्त असल्याने पालीचे विष जास्त पसरले नसल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.