राज्यात आता पर्यंत २६५ पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू ,तिन्ही लाटांमध्ये ४८, ६११ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई,वृत्तसंस्था। महाराष्ट्रात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने हाहाकार घालयाला सुरुवात केली आहे. राज्यात कोरोनाबाधितांची आणि ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. कोरोनाचा संसर्ग नेत्यांना आणि लोकप्रतिनिधींना मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच कोरोनाच्या काळात सेवा देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनाही होत आहे. महाराष्ट्रातील पोलीस कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यत एकूण २६५ पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यातील १२६ मुंबई पोलीस कर्मचारी होते. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आता चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोना निर्बंधांमध्ये पोलीस प्रत्यक्ष रस्त्यावर असल्यामुळे कोरोनाचा संसर्ग होत आहे.
महाराष्ट्र पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होत असल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मागील २४ तासात महाराष्ट्रात ३७० पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनामुळे २६५ कर्मचाऱ्यांनी आपला जीव गमावला आहे. तसेच मुंबई पोलीसमधील १२६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तिसऱ्या लाटेमध्ये मोठ्या संख्यने पोलिसांना कोरोना संसर्ग होत आहे. गेल्या २४ तासात कोरोनाबाधित आढळलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये ६० अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तसेच आतापर्यंत एकूण २१०० पेक्षा अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंबई पोलीसमध्ये ७४१ कर्मचारी कोरोनावर उपचार घेत आहेत.
राज्यात कोरोनाच्या तिन्ही लाटांमध्ये एकूण ४८, ६११ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये ६ हजार २०४ अधिकारी आणि ४२ हजार ४०७ जवानांचा समावेश आह. बुधवारी महाराष्ट्रात ४६ हजार ७२३ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी २७ टक्के जास्त कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.