भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

मोठी बातमी : सोन्याचे दर 65 हजाराच्यावर, वर्षाअखेरीस सोनं “इतक्या” रुपयांनी वाढणार

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। सोन्याला पुन्हा एकदा झळाळी आली असून ऐन लग्नसराईच्या दिवसांमध्ये दिवाळीनंतर पुन्हा एकदा सोन्याचे दर वाढताना दिसत आहेत. सोनं खरेदी करणाऱ्यांच्या खिशाला चांगलीच कात्री लागली आहे. आता सोनं घेण्याचा विचारसुद्धा महागात पडतोय, कारण आज सोन्याचे दर 65 हजार रुपयांच्यावर पोहोचले आहेत.

सोन्याचे दर आज 65 हजार 300 रुपयांवर पोहोचले आहेत. वर्षाच्या सुरुवातीच्या आधीच सोन्या-चांदीच्या दरात वाढ होत आहे तर वर्षाअखेरीस सोनं 68 पर्यंत पोहोचण्याची शक्यता असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी लावला होता.

आज देशात सोन्याचा भाव 24 कॅरेटसाठी 62,730 रुपये आणि 22 कॅरेटसाठी 57,460 रुपये आहे.

पुण्यात 24 कॅरेटचा रेट आज 62,950 तर 22 कॅरेटचा रेट 57,700 रुपये आहे. मुंबईमध्ये 24 कॅरेटचा रेट आज 63 हजार तर 22 कॅरेटचा रेट 57,700 रुपये आहे. नाशिकमध्ये हेच दर 22 कॅरेटचे 57,730 रुपये आहेत. नागपुरात 22 कॅरेटचा दर 57,700 रुपये आहे. 48 तासांत 22 कॅरेट सोन्याचे दर तब्बल दीड ते 2 हजार रुपयांनी सोन्याचे दर वाढले आहेत. तर 24 कॅरेट सोन्याचे दर 2 ते अडीच हजार रुपयांनी वाढले आहेत.

सोने चांदीच्या दरात वाढ झाल्यामुळे बाजारपेठांवर देखील त्याचा परिणाम झाला आहे. परिणामी दागिने खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याचं पाहायला मिळत आहे. दिवाळीत गजबजलेल्या जळगावच्या सराफ बाजारात ग्राहकांची संख्या सध्या मंदावली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या किमतीत वाढ झाल्यामुळे सोने-चांदीच्या दरात ही वाढ झाल्याचं सुवर्ण व्यावसायिकांचं म्हणणं आहे. सोने-चांदीच्या दरामध्ये अचानक झालेल्या दरवाढीमुळे सोनं खरेदी करणाऱ्यांचं बेजेट मात्र कोलमडलं आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!