भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी ; महागाई भत्त्यामध्ये इतक्या टक्क्यांनी वाढ

मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। केंद्रापाठोपाठ आता राज्य शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर दिली आहे. सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यासाठी चार टक्के महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, सरकारी नोकरदारांना आणखी पगार वाढून मिळणार आहे. राज्य सरकारने यासंदर्भात शासन निर्णय जारी केला

केंद्र सरकारने ३ एप्रिल २०२३ रोजी महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३८ टक्क्यांवरुन ४२ टक्के झालेला आहे. केंद्र सरकारच्या पावलावर पाऊल ठेवत आता राज्य सरकारने सुद्धा शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. १ जानेवारी २०२३ पासून ही वाढ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्याचबरोबर शासकीय कर्मचाऱ्यांना गेल्या पाच महिन्यांची थकबाकीही रोखीने देण्यात येणार आहे. वित्त विभागाने त्यासंबंधीचा शासन आदेश शुक्रवारी सृत केला. राज्यातील १७ लाख शासकीय अधिकारी, कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!