भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

राशिभाविष्य ; आज शुक्रवार २३ डिसेंबर, कसा असेल आपला आजचा दिवस

मुंबई,मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। आज 23 डिसेंबर 2022 , ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

मेष (Aries) : बिझनेसशी संबंधित महत्त्वाची प्रपोझल्स मिळतील. नोकरीच्या ठिकाणी स्पर्धेवर भर द्याल. ऑफिसमध्ये सर्वांचा विश्वास जिंकाल. आर्थिक लाभाच्या संधी वाढतील. स्पर्धेत यश मिळेल. गुंतवणूक उत्तम असेल. वाहन आणि जमिनीशी संबंधित प्रकरणांमध्ये सुधारणा होईल.
उपाय : केशरी टिळा लावूनच घराबाहेर पडा.

वृषभ (Taurus) : कामाच्या ठिकाणी सर्वांना सहकार्य मिळेल. व्यावसायिकांच्या नफ्यात वाढ होईल. आर्थिक बाजू उत्तम राहील. करिअर बिझनेसवर लक्ष केंद्रित कराल. अनुकूलता शिखरावर असेल. पारंपरिक कामात क्रियाशीलता दाखवाल. विरोधकांशी संबंधित महत्त्वाची माहिती गोळा कराल.
उपाय : पक्ष्यांना मुक्त करा.

मिथुन (Gemini) : ऑफिसमध्ये काम करताना अनोळखी व्यक्तींपासून दूर राहा. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. कामात सुलभता येईल. बिझनेसमन्स नेहमीच्या गतीने प्रगती करत राहतील. नफ्याचं प्रमाण सर्वसाधारण असेल. नवीन व्यक्तींची भेट होण्याची शक्यता आहे.
उपाय : बहीण, काकू आणि मुलीला बांगड्या भेट द्या.

कर्क (Cancer) : कामाशी संबंधित विविध रिझल्ट्स अनुकूल लागतील. नोकरीत मोठं यश मिळेल. अकाउंट्सवर भर द्याल. सामूहिक प्रयत्नांमधून नेतृत्व क्षमतेचा लाभ घ्या. व्यावसायिक प्रकरणांमध्ये सुधारणा होईल. व्यवसायावरचं नियंत्रण वाढेल. महत्त्वाच्या कामांना गती मिळेल.
उपाय : तृतीयपंथी व्यक्तींचे आशीर्वाद घ्या.

सिंह (Leo) आज कोणाशीही उधारीचे व्यवहार टाळा. सर्वच क्षेत्रात सातत्य राहील. आज मेहनत कराल. संधीचं सोनं कराल. जॉब प्रोफेशन उत्तम असेल. बिझनेसची स्थिती संमिश्र असेल. परिस्थिती सर्वसाधारण राहील. जे ऐकाल त्यावर विश्वास ठेवू नका.
उपाय : शनी मंदिरात तेल दान करा.

कन्या (Virgo) : व्यवसायात प्रगतीसाठी डगमगू नका. सर्व क्षेत्रांत नफा असेल. लवकरात लवकर ध्येय गाठण्याचा विचार कराल. व्यावसायिक परिस्थितीवर नियंत्रण वाढेल. अतिउत्साह टाळा. सहकाऱ्यांवर विश्वास राहील. विरोधकांच्या बाबतीत दक्ष राहाल.
उपाय : गणपतीला मोदकांचा नैवेद्य दाखवा.

तूळ (Libra) : कामासाठी केलेले प्रयत्न सकारात्मक ठरतील.अंगी शिस्त आणि सातत्य ठेवा. इगोच्या सापळ्यात अडकू नका.आर्थिक बाबतीत स्थिती चांगली राहील. संवेदनशील असाल. उद्योगधंद्यात सुलभता असेल. संधीचा फायदा घ्याल. नातेसंबंधांचा लाभ घ्या
उपाय : राम मंदिरात ध्वज अर्पण करा.

वृश्चिक (Scorpio) : करिअर बिझनेसमध्ये विविध प्रयत्न अनुकूल ठरतील. नवीन शक्यता वाढतील. कामात आळशीपणा टाळा. वैयक्तिक प्रयत्न अधिक चांगले होतील. विरोधक शांत राहतील. प्रभाव राहील. जवळच्या व्यक्तींचं सहकार्य मिळेल. नफा उत्तम राहील. प्रभाव वाढेल.
उपाय : दुर्गामातेला हलव्याचा नैवेद्य दाखवा.

धनू (Sagittarius) : नोकरदार व्यक्तींच्या उत्पन्नाचे स्रोत वाढतील. करिअर बिझनेसशी संबंधित व्यक्ती चांगलं काम करतील. व्यवस्थापन प्रभावी ठरेल. आर्थिक बाजूला बळ मिळेल. आर्थिक बाबी उत्तम राहतील. मौल्यवान भेटवस्तू मिळू शकतात. उद्योगांमध्ये यश मिळेल.
उपाय : शंकराला बेलपत्र अर्पण करा.

मकर (Capricorn) : शक्ती आणि धैर्याने कामाच्या ठिकाणी प्रत्येकाला प्रभावित कराल. सर्जनशील कामांना गती मिळेल. बिझनेसच्या प्रकरणांत यश मिळेल. प्रोफेशनल्स प्रभावशाली होतील. दीर्घकालीन नियोजन आकार घेईल. व्यवस्थापन प्रशासनात सुधारणा होतील. आर्थिक व्यावसायिक संधींमध्ये वाढ होत राहील.
उपाय : कामाच्या ठिकाणी सरस्वती देवीची पूजा करा.

कुंभ (Aquarius) : बिझनेस अ‍ॅक्टिव्हिटीजमध्ये रस वाढेल. बजेट तयार करा आणि वरिष्ठांच्या सल्ल्याचं पालन करा. घाईघाईत मोठे निर्णय घेण्याची चूक करू नका. करिअर बिझनेस सर्वसाधारण राहील. नफ्याबद्दल जागरूक राहाल. शत्रूंपासून सावध राहाल.
उपाय : वडिलांचा आदर करा.

मीन:आज नकारात्मक विचार वरचढ होनार नाहित या साठी प्रयत्नशील राहवे लागेल.मानसिक अस्वास्थ्य सतावेल,आरोग्याची तक्रार राहिल,नोकारित वरिष्ठांशी मतभेद संभावतात , संतति च्या समस्या सतावतील.प्रतिस्पर्ध्यावर मात करु शकनार नाही.आज शक्यतो कोणताहि निर्णय घेऊ नका.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!