क्राईममुक्ताईनगर

चुलत भावाकडून तरुणाची हत्या, मुक्ताईनगर तालुक्यातील घटना

मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | शेतजमीनीच्या जुन्या वादातून तरुणाचं चुलतभावाने हत्यारांनी वार करून सुनील रामसिंग चव्हाण (वय-३२, रा.टाकळी ता. मुक्ताईनगर) या तरुणाची हत्या  केल्याची धक्कादायक घटना मुक्ताईनगर तालुक्यातील टाकळी शिवारात घडली. हा प्रकार खून झाल्याची फिर्याद दाखल झाल्या नंतर तपासातून समोर आली.

सुनील चव्हाण हा परिवारासह टाकळी गावात वास्तव्याला असून शेती आणि मजुरीचे काम करून तो परिवाराचा उदरनिर्वाह करत होता.

दरम्यान मयत सुनिल चव्हाण याचे चुलत भाऊ प्रवीण जगन चव्हाण यांचे सोबत शेत जमीनीचा जूना वाद होता. दि. २५ मार्च रोजी सायंकाळीच्या सुमारास सुनील हा मित्रांसोबत जेवण करण्यासाठी दुचाकी क्रमांक (एमएच १९ एसी ४४७३) ने निघून गेला होता. दरम्यान त्यानंतर तो घरी परतला नाही. दुसऱ्या दिवशी २६ मार्च रोजी सकाळी ६ वाजता सुमारास सुनील चव्हाण याचे नातेवाईक रस्त्यावरून येत असताना टाकळी शिवारातील सुरेश चव्हाण यांच्या शेताजवळ सुनील रामसिंग चव्हाण (वय-३२, रा.टाकळी ता. मुक्ताईनगर, यांचा दुचाकी जवळ मृतदेह आढळून आला.

यावेळी त्याच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा असल्याने त्याची हत्या  करण्यात आल्याचे दिसून येत होते. दरम्यान, या घटनेबाबत मुक्ताईनगर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेहाचा पंचनामा केला. मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात मयत सुनील चव्हाण यांचा भाऊ संजय चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी प्रवीण जगन चव्हाण आणि बाळू ममराज जाधव (दोन्ही रा.टाकळी ता. मुक्ताईनगर) यांच्या विरोधात

शनिवारी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील एकाला अटक केल्याची माहिती मिळत असून दुसऱ्या आरोपीला पोलिस्वाटक करण्यासाठी रवाना झाल्याची माहिती मिळत आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश पाटील करीत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!