भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगावधरणगाव

लुटीच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांकडून व्यापाऱ्यांचा खून : एक जण जखमी !

जळगाव, मंडे टू मंडे वृत्तसेवा :  पाळधी येथील साईबाबा मंदिराजवळ आज शुक्रवारी रात्री कारमधील दोघांवर चाकूहल्ला करून रोकड लांबविण्याचा प्रयत्नात कापूस व्यापाऱ्यांचा खून केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे.

सविस्तर वृत्त असे की, फरकांडे येथील धनदाई ट्रेडर्सचे कापूस व्यापारी स्वप्नील रत्नाकर शिंपी हे चारचाकी क्रमांक एमएच.०१.एएल.७१२७ ने दिलीप राजेंद्र चौधरी याच्यासोबत जळगावला आले होते. दोघे दुपारी जळगावात आल्यानंतर त्यांनी दोन व्यापाऱ्यांकडून अंदाजे १५ लाख रोकड घेऊन ते पुन्हा घरी जात होते. रोकड हवाल्याची असल्याचे समजते. प्रतापनगरातून ८ वाजेच्या सुमारास एका मेडिकलहून वडिलांच्या गोळ्या घेतल्यानंतर ते पाळधीच्या दिशेने निघाले होते. पाळधी येथील साईबाबा मंदिराच्या पुढे गेल्यावर ८.३० च्या सुमारास म्हसोबा मंदिराजवळ महामार्गावर दोन दुचाकीने आलेल्या चौघांनी चारचाकीसमोर दुचाक्या आडव्या लावल्या. शिवीगाळ करीत त्यांनी पुलावर तुम्ही एकाला धडक दिली असल्याचे सांगितले. चारचाकीचा काच खाली करताच एकाने हात घालून दरवाजा उघडला तर दुसरा मागील सीटवर बसला.

मागे बसलेल्या हल्लेखोराने लागलीच चाकू काढून वाहन चालवीत असलेल्या स्वप्नील शिंपी यांच्यावर हल्ला केला. चाकु पाहताच मागे बसलेला दिलीप चौधरी हा बाहेर पडला तर स्वप्नील शिंपी हे देखील बॅगसह बाहेर पडले. हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग करीत आणखी वार केले. मारहाणीत शिंपी रस्त्याच्या कडेला पडले. दिलीप चौधरी याने मदतीसाठी आरडाओरड केल्याने दोन तरुण धावून आले. त्यांना पाहताच हल्लेखोरांनी पळ काढला. गंभीर दुखापत झाल्याने स्वप्नील शिंपी यांचा जागीच मृत्यू झाला. मयत शिंपी यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला असून नातेवाईकांनी गर्दी केली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले हे पथकासह आले तपास करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!