जळगाव जिल्ह्यात तरुणीचा खून
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l आज सकाळी ९ ते १० वाजेच्या सुमारास शीतल जय घोगले या २७ वर्षीय तरुणीचा खून झाल्याची घटना उघडकीस आली. ही घटना अमळनेर शहरातील गांधली पुरा परिसरात घडली. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
अमळनेर शहरात गांधली पुरा परिसरात राहणाऱ्या शीतल जय घोगले वय २७ वर्ष. या तरुणी चा मृतदेह डोक्याला मार लागलेला, गळ्यावर गळा आवललेला असल्याची खूण,व हातावर जखमा असलेल्या स्थितीत आढळला. मृत्यूपूर्वी झटापट झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
घटनास्थळी पोलिस उप अधीक्षक सुनील नंदवाळकर, पो.नी विकास देवरे, आपल्या सहकाऱ्यांसह दाखल होत पुढील तपासला सुरुवात केली आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात पाठविण्यात आला असून खून कोणी केला? का केला? हे अद्याप गुलदस्त्यात आहे.