नोकर्याच नाही तर आरक्षण देऊन तरी… नितीन गडकरी यांचं आरक्षणाबाबत मोठं विधान !
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
नागपूर : सध्या राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरुन अनेक चर्चा रंगल्या आहेत. यातच आरक्षणाच्या (Reservations) विषयावरुन अनेक आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. अशातच केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आरक्षणाबाबत एक मोठं विधान केलं आहे. त्यावेळी गडकरी हे आज (शनिवारी) नागपुरात बोलत होते.
त्यावेळी बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, आपल्या देशात ज्याला त्याला नोकरी हवी असते. चौकटीबाहेरचा विचार कुणी करत नाही आणि समजून घेत नाही. मुळात सरकारी नोकर्याच नाही तर त्यात आरक्षण देऊन काय फायदा…आरक्षण हा केवळ राजकारणाचा विषय झाला आहे. आपल्याकडच्या राजकारण्यांची दृष्टीच वेगळी आहे. मागास असणे ही पूर्णपणे राजकीय बाब झाली आहे, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. यशस्वी उद्योजकाने दलित समाजातील 100 तरुणींना उद्योजक म्हणून घडवावे. अशा प्रकारच्या प्रयत्नांतूनच आर्थिक आणि सामाजिक समता प्रस्थापित होईल.