भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यमहाराष्ट्र

“नीरी”चं महत्वपूर्ण संशोधन;
कोरोना चाचणीसाठी नाकातून किंवा तोंडातून स्वॅब घेण्याची गरज नाही.

Monday To Monday NewsNetwork।

नागपूर(वृत्तसंस्था)।कोरोनाच्या आरपीसीआर चाचणीसाठी आता नाकातून किंवा तोंडातून स्वॅब घेण्याची गरज नाही. त्यासाठी आता आरोग्य कर्मचाऱ्यांची देखील गरज नाही. कारण नागपुरातील निरी संस्थेच्या व्हायरॉलॉजी शाखेनं नवीन पद्धत शोधून काढली आहे. कोरोना चाचणीसाठी सलाईन वॉटरच्या पंधरा सेकंद गुळण्या कराव्या लागतील. हेच सॅम्पल कोरोना चाचणीसाठी वापरण्यात येणार आहे. आता याला आयसीएमरने सुद्धा मान्यता दिली आहे.सध्या आरटी-पीसीआर चाचणीसाठी नाकात किंवा घशातील स्वॅब घेऊन तो रसायनिक द्रव असलेल्या ट्यूबमध्ये टाकतात. नंतर तो प्रयोगशाळेत पाठवला जातो. त्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया केल्या जातात. कोरोनाचा संसर्ग झाला की नाही, हे पाहण्यासाठी स्वॅबमधील विविध कणांमधील आरएनएन वेगळा करण्याची (एक्सट्रॅक्शन) प्रक्रिया असते. त्यानंतरच्या चाचणीत हा आरएनए कशाचा आहे, हे समजते आणि कोरोना संसर्ग झाला की नाही, याचे निदान होते. त्यासाठी सुसज्ज प्रयोगशाळा असली, तर चार तासांचा अवधी लागतो.मात्र,

आता नागपुरातील निरी या संस्थेनं कोरोना चाचणीसाठी एक नवीन पद्धत शोधून काढली आहे. त्यासाठी आता आरोग्य कर्मचाऱ्यांचीही गरज पडणार नाही. यामुळे स्वॅबसाठी जे तंत्रज्ञान लागत होते, चाचणी साठी होणारी जी गर्दी होत होती ती गर्दीही ती कमी होईल. या साठी फक्त सलाइन वॉटरच्या १५ सेकंद गुळण्या करून ते नमुने चाचणीसाठी वापरण्यात येणार असल्याचे संस्थेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. पाण्याची घनता ही हवेपेक्षा ८०० पटीने अधिक असते. सलाईनच्या पाण्याच्या गुळण्यांमुळे विषाणू त्यामध्ये येईल. त्यामधून त्याला ट्यूबमध्ये घेता येईल. यामुळे स्वॅबसाठी जे तंत्रज्ञान लागत होते, जी गर्दी होत होती ती कमी होईल.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!