भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

खळबळजनक: शीतपेयाद्वारे गुंगीचे औषध देऊन त्यानं विवाहित मैत्रिणीवर केला अत्याचार !

नागपूर (वृत्तसंस्था)। शीतपेयाद्वारे गुंगीचे औषध देऊन ३० वर्षीय विवाहितेवर अत्याचार करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी अत्याचारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून युवकाला अटक केली आहे. शोएब शब्बीर शेख (वय ३०, रा. रहमत मंजील, महादुला),असे अटकेतील युवकाचे नाव आहे. तो बांधकाम कंत्राटदार आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित ३० वर्षीय महिला खासगी कंपनीत कार्यरत असून दक्षिण नागपुरात राहाते. महाविद्यालयात शोएब व ती सोबत शिकायची. त्यामुळे ती शोएबला ओळखते. लग्नानंतरही शोएब तिच्या संपर्कात होता काही दिवसांपूर्वी त्याने महिलेला भेटायला बोलाविले पण तिने नकार दिला. आपल्या दोघांचे प्रेमसंबंध असल्याचे तुझ्या पतीला सांगेल, अशी धमकी शोएब याने तिला दिली. त्यामुळे ती सीताबर्डी येथे शोएब याला भेटायला आली. शोएब याने तिला हॉटेल तारा डिलक्समध्ये नेले व तिथे शीतपेयाद्वारे तिला गुंगीचे औषध दिले. महिला बेशुद्ध झाल्यावर शोएबने तिच्यावर अत्याचार केला. दोन तासानंतर ती शुद्धीवर आली. अत्याचार झाल्याचे तिला समजले. ती घरी गेली. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी महिला खरेदीसाठी सीताबर्डी येथे आली. शोएबने तिला गाठले. पुन्हा हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला. महिलेने पतीला याबाबत सांगितले. त्यानंतर पतीसह महिलेने पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून शोएब याला अटक केली. त्याची दोन दिवस पोलिस कोठडी घेण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!