परीक्षेत पास करतो, विद्यार्थीनीकडे प्राध्यापकाची शरीर सुखाची मागणी
नागपूर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी धक्कादायक घटना नागपूर येथे घडली,प्राध्यापकाने शाळेय परिक्षेत पास करतो असं अमिष दाखवून विद्यार्थीनीला शरीर सुखाची मागणी केली . ही घटना महाराष्ट्र राज्याची उपराजधानी नागपूर मधील सिंद्धू महाविद्यालयात घडली.
सध्या मुलांच्या शालांत परीक्षा आणि महाविद्यालयीन परीक्षा संपल्या असून काही दिवसात निकालही जाहीर होईल.
परीक्षेत पास करण्याच अमिष देण्याची महाराष्ट्रात आतापर्यंत अशी अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत.सिंद्धू महाविद्यालयातील प्राध्यापक राकेश गेडाम यांनी चक्क विद्यार्थीनीकडे शरीर सुखाची मागणी केली, प्राध्यापकांच्या या विचित्र मागणीने विद्यार्थिनीने आपल्या मैत्रीणींसोबत थेट पोलिस स्टेशनच गाठल्याने हे प्रकरण उघडकीस आले. नागपूर मधील पाचवली पोलिस स्टेशनमध्ये प्राध्यापक राकेश गेडाम यांच्यावरती विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाची कसून चौकशी करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर आणखी अशी काही प्रकरणं आहेत का ? याचा पोलिस तपास करणार आहेत.
.