भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

फेसबुक मैत्रीचा फायदा घेत जळगाव,नागपूर मध्ये अत्याचार नंतर गर्भपात

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

नागपूर,वृत्तसंस्था। एका फेसबुक फ्रेंडने विवाहितेवर नागपूर, जळगावात अत्याचार केल्याची घटना घडली आहे. विवाहित महिला फेसबुकवरून जळगावच्या युवकाच्या प्रेमात पडली. प्रेयसीसाठी त्याने नागपूर गाठले आणि तिचा पती नसताना बलात्कार केला. गर्भवती झाल्यानंतर तिचा बळजबरीने गर्भपात केला आणि लग्नासही नकार दिला. याप्रकरणी पोलिसांनी फेसबुक फ्रेंडवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला. देवेंद्र विकास पवार असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३६ वर्षीय महिला जरीपटक्यात राहते. महिलेचे १८ व्या वर्षी लग्न झाले असून तिचा पती खाजगी वाहनचालक आहे. तिला एक मुलगा व मुलगी आहे. पतीसोबत पटत नसल्याने ती मुलांना घेऊन वेगळी राहते. ती खाजगी दवाखान्यात परिचारिका म्हणून कार्यरत आहे. तिची सप्टेंबर २०१७ मध्ये जळगाव येथे राहणारा देवेंद्र पवार (३८, रा. चांदसार, जि. जळगाव) याच्याशी फेसबुकवरून फ्रेंडशिप झाली.

लग्नाचे आमिष दाखविले
सुरुवातीला काही दिवस चॅटिंग केली. त्यानंतर देवेंद्रने तिला भेटण्यासाठी जळगावला बोलावले. त्यानंतर ती देवेंद्रला भेटण्यासाठी जळगावला गेली. देवेंद्रने तिला मित्राच्या घरी नेऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर त्याने तिला लग्नाचे आमिष दाखविले.
पतीपासून वेगळी रहात असल्याने पतीला घटस्फोट देऊन ती देवेंद्रसोबत लग्न करणार होती. त्यानंतर देवेंद्र नागपूरला आला. शताब्दी चौकात भाड्याने खोली घेऊन काही दिवस ते पती पत्नीप्रमाणे राहत होते. २०१९ मध्ये महिला ही जरीपटका हद्दीत कुशीनगर येथे रहायला गेली. तेथेही त्याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.महिला देवेंद्रपासून गर्भवती झाली. तिने गर्भपात करण्यास नकार दिला. त्याने तिला लग्न करण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर त्याने तिचा बळजबरी गर्भपात करून घेतला. त्यानंतर देवेंद्रने लग्न करण्यास नकार दिला. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!