लग्ना साठी पैसे नसल्याने चिंताग्रस्त पित्याकडून संतापाच्याभरात मुलीचा खून
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
नांदेड,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। जमीन असूनही शेतात काही पिकत नाही,घरात अठराविश्वे दारिद्र्य,कुटुंबाचा उदरनिर्वाह करणेही शक्य नसताना त्यात मुलीच्या लग्नाची बोलणी सुरू,जवळ पैसे नसल्यामुळे शेती विकावी लागण्याने चिंताग्रस्त,काय करावे हे सुचत नसताना पित्या कडून होणाऱ्या वधू मुलीचा खून झाल्याची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील जामखेड येथे घडली.
अधिक वृत्त असे की, नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील जामखेड येथील बालाजी विश्वंभर देवकते यांच्याकडे जवळपास पाच एकर शेती घरात दोन मुले आणि दोन मुली व पत्नी असा परिवार,संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवरच,
परंतु निसर्गाचा कोप ,शेतीत काही पिकत नसल्याने गेल्या काही वर्षांपासून आर्थिक अडचणीत कुटुंब सापडलेलं असताना सिंधुताई देवकते ही १८ वर्षाची मुलगी विवाहयोग्य झाली होती. एका ठिकाणी तिच्या लग्नाची बोलणी सुरू होती. त्यात लग्नासाठी पैसे कुठून आणावेत म्हणून बालाजी देवकते हे मोठे चिंतित होते.
१९ एप्रिल रोजी सकाळी ११ ते १२ वाजेच्या दरम्यान बालाजी देवकते चिंतेत असताना घरी आले असता घरात लग्नाचा विषय निघताच त्यांनी संतापाच्याभरात, लग्नासाठी पैसे जमा कसे करू? तुझ्या लग्नासाठी आता काय शेती विकू? असे म्हणून मुलगी सिंधुताईच्या डोक्यात लाकडाचा दंडुका मारला. त्यावेळी तिची आई अहिल्याबाई मध्यस्थी करीत असताना त्यांनाही दुखापत झाली. परंतु लाकडाचा डोक्यात जोरात दणका बसल्याने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सिंधुताईचा जागेवरच मृत्यू झाला. पीत्यानेच मुलीचे हात पिवळे करून सासरी पाठविण्या ऐवजी मुलीचा खून करून स्मशानभूमीत पाठवले.