भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

अकरा हजाराची लाच घेतांना पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

नांदेड,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। नांदेड जिल्ह्यातील उमरी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाला गुन्ह्यातील जप्त असलेला ट्रक सोडण्यासाठी अकरा हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात अटक केली ,या घटनेने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

तक्रारदाराच्या मामा विरुद्ध उमरी पोलीस स्टेशन मध्ये दाखल गुन्ह्यात मदत केली म्हणून आणि गुन्ह्यातील जप्त असलेला ट्रक सोडण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील उमरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शेख नजीर हुसेन आमिर हजमा वय ५७, (नांदेडच्या खडकपुरा भागातील वकील कॉलनी) यांनी ११ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करुन ती स्वतः स्वीकारतांना एसीबी ने त्यांना अटक केली. सापळा अधिकारी म्हणून ला. प्र. वि. नांदेड चे अशोक इप्पर, पोलीस उप अधीक्षक हे होते.

सापळा पथकात पोना एकनाथ गंगातीर्थ, जगन्नाथ अनंतवार, ईश्वर जाधव , शेख मुजीब लाप्रवि नांदेड होते.डॉ. राहुल खाडे, पोलीस अधीक्षक , लाचलुचपत प्रतिबंधक विभाग औरंगाबाद परिक्षेत्र औरंगाबाद अतिरिक्त पदभार नांदेड, धरमसिंग चव्हाण, अपर पोलीस अधीक्षक लाप्रवि,नांदेड परिक्षेत्र नांदेड, श्री राजेंद्र पाटील, पोलीस उपअधीक्षक लाप्रवि,नांदेड यांनी मार्गदर्शन केले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!